Download App

आत्रामांच्या लेकीचं ठरलं, भाग्यश्री आत्राम ‘या’ तारखेला करणार शरद पवार गटात प्रवेश

भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. त्या 12 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Bhagyashree Atram : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा झटका दिला. मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांची कन्या भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. त्या 12 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. हा आत्राम यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Deepika Padukone Baby Photo : दीपिका-रणवीरच्या लेकीची पहिली झलक; फोटो व्हायरल 

गेल्या महिनाभरापासून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ह्या शरद पवार गटाते प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. त्या त्यांचे वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. तर काहीच दिवसांपूर्वी भाग्यश्री यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. अशातच धर्मरावबाबा आत्राम यांनी जावई आणि मुलीला न सोडण्याची धमकी दिली होती.

खूशखबर! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ, फडणवीसांची मोठी घोषणा 

जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, मुलीला नदीत टाकेन, अशी धमकी दिली होती. दरम्यान, बापाच्या धमकीला न घाबरता भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करणारअसून या पक्षप्रवेशाची तारीखही ठरली आहे. भाग्यश्री आत्राम ह्या 12 सप्टेंबर रोजी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा 12 सप्टेंबरला अहेरीत होणार आहे. यावेळी भाग्यश्री या शरद पवार गटात प्रवेश करतील. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

राज्यामध्ये काका विरुद्ध पुतण्याच्या राजकारणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे समोर येत आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री यांनी विधानसभेसाठी वडिलांविरोधात रणशिंग फुकले. त्यामुळे विधानसभेत बाप विरुद्ध मुलगी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

 

 

follow us