Bhandar soni murder case : भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल आज दिला. या हत्याकांड प्रकरणी सातही मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला होता. विशेष म्हणजे 26 फेब्रुवारी 2014 मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर 9 वर्षांनी निकाल लागला आहे.
जिल्ह्यातील तुमसर शहरातील रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या सराफा व्यावसायिक संजय चिमणलाल सोनी (47), पुनम संजय सोनी (43), ध्रुमिल संजय सोनी (11) ह्या एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या झाली होती. ही हत्या कोणी बाहेरच्या व्यक्तीने केली नव्हती तर त्यांचा चालकाने कट रुचून हत्या केली होती.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, या निर्णयाचे नुकसान..
प्रकरण नेमकं काय होत?
तुमसर येथील सराफ संजय सोनी (42), त्यांची पत्नी पूनम सोनी (40) मुलगा धृमील सोनी यांची त्यांचा चालक आणि त्याच्या सहा साथीदारांनी निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येनंतर या सर्वानी घरातून आठ किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असा साडेतीन कोटींचा ऐवज लंपास केला होता. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व सातही आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसर येथून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.
कलावंतांची परिस्थिती सांगता सांगता प्रिया बेर्डे पत्रकार परिषदेतच रडल्या
जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे
शहानवाज ऊर्फ बाबू सत्तार शेख (32), महेश सुभाष आगासे (35), सलीम नजीम खा पठाण (34), राहुल गोपीचंद पडोळे (32), मोहम्मद अफरोज ऊर्फ सोहेल युसूफ शेख (34), शेख रफिक शेख रहमान (45) व केसरी मनोहर ढोले (34) अशी नावे आहेत.