Download App

निवडणुकीतून माघार! ‘काकागिरी’, ‘दादागिरी’ अन् ‘नानागिरी’ला आशिष देशमुख देणार आव्हान

नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आज (18 जून) त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी आशिष देशमुख यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असला तरीही आपण 2024 ची निवडणूक लढविणार नसल्याचे घोषित केले. यामुळे आता आगामी काळात देशमुख यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (BJP Leader Ashish Deshmukh Announce that they will not contest any election in 2024 Polls)

आशिष देशमुख म्हणाले, इथे बसलेल्या सगळ्यांना वाटते का मी आमदारकीसाठी तिकडून इकडे आलो? तर तसं नाही. मी आज जाणीवपूर्वक एक घोषणा करतो की, मी येणारी 2024 ची कोणतीही निवडणूक, मग ती लोकसभा असो वा विधानसभा असो लढविणार नाही. मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन. ओबीसीच्या कल्याणासाठी, विदर्भाच्या व्यापक विकासासाठी आणि हितासाठी, भाजपच्या माध्यमातून काम करेन, अशी घोषणा यावेळी त्यांनी केली.

“माझ्या आयुष्यातील 4 वर्ष ‘फुकट’ गेली” : आणखी एका बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ

काटोलातील काकागिरी, सावनेरमधील दादागिरी अन् विदर्भातील नानागिरी…

यावेळी आशिष देशमुख यांनी जरी मी निवडणूक लढणार नसलो तरीही येत्या निवडणुकीत काटोलमधील काकागिरी, सावनेरमधील दादागिरी आणि विदर्भातील नानागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निश्चय केला. काटोलमधून काका अनिल देशमुख, सावनेरमधून आशिष देशमुख आणि विदर्भातून नाना पटोले यांच्या पराभावासाठी प्रयत्न करणार असल्याचा इरादा त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

चाणाक्यांनी कोणताही उमेदवार निवडावा…

यावेळी आशिष देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा करतानाच कोणताही उमेदवार निवडावा, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आशिष देशमुखांची, असं म्हणतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले. ते म्हणाले, कोणत्याही कार्यकर्त्यांला नाराज होण्याची गरज नाही. माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्याचे प्रायश्चित म्हणून आणि या विदर्भात, या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासारखा चांगला पक्ष रुजला पाहिजे, घरोघरी, व्यक्ती-व्यक्तीपर्यंत पोहचला पाहिजे, त्या माध्यमातून जनसामान्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, असा आशावाद बोलून दाखविला.

Tags

follow us