Download App

CM चंद्रपुरात सुधीरभाऊ मुंबईत, कार्यक्रमालाही दांडी; मुनगंटीवारांनी सगळचं सांगितलं..

ताकद दिल्याने कुणी मोठा होत असतो का. मी इतकी झाडं लावली. झाडं लावल्यानंतर त्या झाडाचा गुण असतो की किती उंच जायचं.

Sudhir Mungantiwar : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना डावलण्यात आलं. यानंतर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. मुनगंटीवारांनीही स्वतःला अलिप्त केलं. त्यामुळे ते नाराज आहेत या चर्चांना अधिकच बळ मिळालं. आताही असाच एक प्रसंग घडलाय. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात आहेत पण येथे नेमके सुधीर भाऊ उपस्थित नाहीत. त्यामुळे मुनगंटीवारांची नाराजी अजूनही कायम आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी चंद्रपुरातील कर्मवीर मारोतराव कन्नमवार जयंती सोहळ्यास उपस्थित राहू शकणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांना आधीच सांगितलं असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला नक्की पश्चाताप… आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा रोख कुणाकडं?

महाविकास आघाडीत काय सुरू आहे यावर भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. पण एक खरं आहे की निवडणुकीतील पराभवाचं आत्मचिंतन जाहीरपणे करण्याऐवजी एकत्रित बसून केलं पाहिजे. आता पराभवाचं विश्लेषण करून झालेला पराभव विजयात बदलता येणार नाही. विजयानंतर त्या विजयाला पराभवात जाऊ द्यायचं नसेल तर तो विजय देखील नम्रपणे स्वीकारला पाहिजे. आणि पराभव जर कायमस्वरुपी करायचा नसेल तर जो बदल मी माझ्यात केलाय मला वाटतं की पराभवानंतर विजयाकडे सुद्धा जाता येतं. कोणताही पक्ष किंवा कोणताही राजकीय नेता हा काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नसतो.

शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विचारांत कुठेच समानता नाही. रेल्वेच्या पटरी जशा कधीच एकत्र येत नाहीत. आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही तसं हे होतं. यांच्यात एकत्रित येण्यासारखं काहीच कारण नव्हतं. म्हणून मला वाटतं तत्कालीक स्वार्थासाठी कधी कधी दूरगामी नुकसान सहन करावं लागतं त्यातला हा प्रकार आहे.

आजच्या चंद्रपुरातील कार्यक्रमास तुम्ही उपस्थित नसल्याने वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत असे विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांशी आज सकाळीच चर्चा केली. काल मला कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं. शिफ्टिंग सुरू आहे आणि उद्या मला शिर्डीला जायचं आहे त्यामुळे मला या कार्यक्रमाला येणं शक्य होणार नाही असे मी त्यांना सांगितलं होतं.

भुजबळ अन् मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपची प्रतिक्रिया; काय म्हणाले बावनकुळे?

ताकद दिल्याने कुणी मोठा होत नाही

सुधीर मुनगंटीवार यांना डावलून जोरगेवारांना ताकद दिली जात आहे का? असे विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ताकद दिल्याने कुणी मोठा होत असतो का. मी इतकी झाडं लावली. झाडं लावल्यानंतर त्या झाडाचा गुण असतो की किती उंच जायचं. त्यामुळे कोणत्या झाडाला किती खतपाणी दिल्याने कोणतं झाड मोठं होतं का. मग एखादं झाड शंभर फुटाचंही येऊ शकलं असतं पण खतपाणी दिल्याने असं होऊ शकतं का.. कामानेच मोठं व्हावं लागतं. खतपाण्याने झाडाची उंची किती व्हावी हे ठरलेलं असतं.

विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल पुन्हा वापसी करू इच्छित आहेत त्यांच्याबाबतीत काय धोरण असेल यावर मुनगंटीवार म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष ठरवतील. पण ज्यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केलं म्हणा बंडखोरी केली म्हणा त्यांना आता पुन्हा पक्षात घेताना काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांतही वेगळा मेसेज जाऊ शकतो त्यामुळे मला वाटतं की असे निर्णय करताना सावधानता बाळगली पाहिजे.

follow us