Buldhana Bud Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी बसला लागलेल्या भीषण आगीत 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता या अपघाताबाबत अनेक गोष्टी समोर येत असून, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार अपघातानंतर बसला आग लागली. त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काही जणांनी केला आहे.
‘समृद्धी’वर 26 जणांचा मृत्यू : रस्त्यावरील त्रुटी सांगत गडकरींनी 4 दिवसांपूर्वीच काढले होते वाभाडे
जीव वाचवण्यासाठी काचेवार हात मारत होते प्रवासी
दरम्यान, रॉडला धडकून अपघात झाल्यानंतर काही मिनिटांनंतर बसने पेट घेतला. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण 33 प्रवाशांपैकी 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर, बसचा चालक आणि अन्य प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहर पडत स्वतःचा जीव वाचवला. मात्र, जे प्रवाशी बसमध्ये अडकले होते. ते जीवाच्या आकांताने आणि जीव वाचवण्यासाठी बसच्या काचांवर हात मारत गयावया करत होते. मात्र, त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या अन्य प्रवाशांनी काचा फोडण्यास मदत केली असती तर, मृतांचा आकडा कमी होण्यास नक्कीच मदत झाली असती असा दावा काहींनी केला आहे.
समृद्धी महामार्ग बस अपघात : प्रवाशांचे फक्त सांगाडे, ओळख कशी पटविणार ?
मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर
दरम्यान, या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण या अपघाताबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. याशिवाय अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?
चालकाने सांगितले कसा झाला अपघात ?
बुलढाण्याचे एसपी सुनील कडासेन यांनी सांगितले की, अपघातात २६ प्रवासी जिवंत जाळले, तर चालक-कंडक्टरसह सात प्रवासी जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन मुले असून उर्वरित प्रौढ आहेत. हा अपघात कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, आधी बसचा टायर फुटला, नंतर बस उलटली आणि नंतर गाडीच्या डिझेल टँकरने पेट घेतला, असे चालकाचे म्हणणे आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.