मुनगंटीवार आणि जोरगेवार समर्थक चंद्रपूर महानगरपालिकेत भिडले ! एकमेंकाना धक्काबुक्की

Chandrapur Municipal Corporation-महापालिकेची सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्याच्या निर्णयानंतर सत्ताधारी सुधीर मुनगंटीवार- किशोर जोरगेवार यांचे समर्थक आमने-सामने.

Bjp Chandrapur

Bjp Chandrapur

Chandrapur Municipal Corporation: चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Municipal Corporation) सत्ताधारी भाजपचे (BJP) दोन गट एकमेंकाविरोधात भिडले आहेत. त्यामुळे काही वेळ महानगरपालिकेत तणाव निर्माण झाला होता. शेवटची पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. महापालिकेची सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्याच्या निर्णयानंतर सत्ताधारी भाजपमधील माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांचे समर्थक आमने-सामने आले होते.

शुक्रवारीची सर्व सर्वसाधारण सभा महापौर संगीता खांडेकर यांनी रद्द केली. काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीशी संबंधित एका विषयावर स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी तीव्र विरोध करत आयुक्त अनुकुरी नरेश यांना दालनात घेराव घातला.

वैभव सूर्यवंशी दुसरा सामना खेळणार की संजू अन् अभिषेकला पुन्हा मिळणार संधी? प्रशिक्षक मॉर्केलने केला मोठा खुलासा

त्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले. नगरसचिवांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानंतर आंदोलक नगरसेवक महापौरांच्या दालनासमोर पोहोचले, स्वपक्षीय महापौरांविरोधात घोषणाबाजी केली. काही नगरसेवकांनी भजन मंडळीसह अनोखे आंदोलन करत निषेध नोंदवत होते. त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार समर्थक नगरसेवक महापालिकेत दाखल झाल्याने दोन्ही गट समोरासमोर आल्याने भडका उडाला. त्यानंतर काही क्षणांत धक्काबुक्कीत झाले. दोन्ही बाजूंचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिसरात गोंधळ उडाला. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


दोषींना कठोर शिक्षा द्या; राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर संघाची पहिली प्रतिक्रिया


वाद पुन्हा रविंद्र चव्हाणांकडे जाणार

हा वाद आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडे जाणार आहे, महानगरपालिकेतील सभागृह जुमडे यांनी तसे संकेत दिले आहेत. जुमडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, गटनेते शेखर शेट्टी यांना पदावरून हटविण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version