Download App

आरोपीला स्थानिक नेत्यांनीच पळवून लावलं; पोलिस तपासात उघड, फडणवीसांनी सांगितलं

Chandrapur Rape Case : चंद्रपूर अत्याचार प्रकरणात (Chandrapur Rape Case) स्थानिक नेत्यांनीच आरोपीला पळवून लावलं असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलायं. दरम्यान, काँग्रेसचा पदाधिकारी अमोल लोंढे याने सहावीतल्या शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला पळवून जाण्यास स्थानिक नेत्यांनी मदत केली असल्याचं स्पष्ट केलंय. नागपुरात बोलताना फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

“सावरकर ब्राह्मण होते, गोमांस खात होते”; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, अत्याचार प्रकरणातील आरोपी अमोल लोंढे हा राहुल गांधी विचारमंच नावाने काँग्रेसची संघटना चालवतो. ज्याच्या घरात काँग्रेसची नगरसेविका आहे, त्याच्याच घरात काँग्रेसचे जिल्ह्याचे पद आहे. त्यांनीच शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. त्याच्यावर कडक कारवाई करुन कडक शासन केले जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

गोळीबार प्रकरणात गोविंदाच्या अडचणी वाढणार, मुंबई पोलीस पुन्हा समन्स पाठवणार?

तसेच स्थानिक नेत्यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच अशा प्रकारच्या घटनांमध्ये पक्ष वैगरे बघत नाही, आरोपी हा आरोपी असतो. त्यामुळे त्याच्यावर व त्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

पूजा खेडकरचा राज्याच्या मुख्य सचिव अन् मागासवर्ग आयोगाला मेल; मेलमध्ये केली ‘ही’ मागणी

पुण्यात स्कुल व्हॅनचालकावर गुन्हा!
पुण्यात स्कुलव्हॅन चालकाने शाळकरी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केलीयं. चौकशीत त्याने इतर मुलींशीही तसाच प्रकार केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी वाहनचालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

दरम्यान, लाडकी बहिण योजनेवरुन होत असलेल्या टीकेवरुनही फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलंय. लाडकी बहिण योजनेबद्दल विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. विरोधकांसह काही लोकांना ही योजना ताण वाटत असेल पण आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा ताण वाटत नसल्याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलंय.

Tags

follow us