Chandrasekhar Bawankule; नितीन गडकरींची मते मोजणाराही पागल झाला पाहिजे

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर भाजपच्या (BJP) गोटात मोठी खळबळ उडाली होती. यापुढे मतांसाठी आपण कोणाला लोणी लावणार नाही, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कंबर […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर भाजपच्या (BJP) गोटात मोठी खळबळ उडाली होती. यापुढे मतांसाठी आपण कोणाला लोणी लावणार नाही, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी नितीन गडकरी यांच्यावर नागपूरातील एका कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळली आहेत. बावनकुळे म्हणाले की, नितीन गडकरींमुळे नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींनी एवढं काम केले आहे की, त्यांना आता मते मागावीच लागणार नाहीत. पण राजकारणात मतं मागावी लागतात. आता आपल्या सर्वांची जबाबदारी असून गडकरी यांना सात लाखांपेक्षा जास्त न भूतो ना भविष्यती इतके मते मिळाली पाहिजेत. त्यांना मिळालेली मते मोजणाराही पागल झाला पाहिजे.

शिरसाट खोके देत नाहीत म्हणून ते मंत्री होत नाहीत; चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य

नागपूर शहरातील एका उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते.

बावनकुळे पुढं म्हणाले, नितीन गडकरी यांना आगामी निवडणुकीत मते मागण्याची गरजच पडणार नाही. आगामी निवडणुकीत गडकरी यांचा विजय सात लाख मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही, इतके चांगले काम गडकरींनी केले आहे. गडकरींमुळे नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींचा एक वर्षाचा, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत उर्वरीत कामे पूर्ण होतील, असे ते म्हणाले.

Exit mobile version