शिरसाट खोके देत नाहीत म्हणून ते मंत्री होत नाहीत; चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य

Untitled Design   2023 04 02T162052.560

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघातील प्रमुख तीन पक्षांची पहिलीचं संयुक्त सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काही गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान, या वज्रमुठ सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडं राज्याच लक्ष लागलं आहे. अशातच आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान केलं की, ठाकरेंनी गडाखांकडून घेतलेल्या खोक्यावर बोलावर. शिरसाटांच्या या आरोपाला आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी जोरदार पलटवार केला.

शिरसाट यांच्या वक्तव्यावर बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की, कोण संजय शिरसाट…. गद्दारी केले ते शिरसाट…. संजय शिरसाट तुला माहित असेल तर तू सांग की, गडाखांकडून उद्धव ठाकरेंनी किती खोके घेतले ते? आणि शिवसेनेतून बाहेर पडतांनी तूला जे काही खोके मिळाले होते, ते खोके तू शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होत असतांना दिले नाही. म्हणून तुला मंत्रिपद मिळालं नाही, अशी टीका खैरे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच वातारवण पहायला मिळत आहे. शिदें गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. ठाकरेंनी गडाखांकडून घेतलेल्या खोक्यावर बोलाव, असं ते म्हणाले होते. त्यालाच आता चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं.

इम्रान खानच्या दाव्याने खळबळ ! म्हणाले, माजी लष्करप्रमुखांनी भारताबरोबर..

आज वज्रमुठ सभा आहेच. शिवाय, सावरकरांची गौरव यात्राही संभाजीनगरमध्ये निघत आहे. सभा आणि सावरकर गौरव यात्रा एक ठिकाणी येणं हा योगायोग आहे, असं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितलं होतं. दरम्यान, यावरही खैरे यांनी उत्तर दिलं. चंद्रकांत खैरे म्हणाले की, कराड यांनी हटकून हा प्रकार केला. भांडणं लावणं हा यांचा उद्देश आहे. राज्यात आपलं सरकार असतांना सर्वधर्मीय लोक, सर्व घटक हे आपल्यासाठी सारखे असतात, हे यांच्या लक्षात येत नाहीत. या शहराची शांतता तुम्ही कायम ठेवणार आहात की नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

Tags

follow us