Download App

गोवारी घटनेनंतर पवारांनी राजीनामा दिला नव्हता; आता त्यांना काय अधिकार ? बावनकुळेंचा सवाल

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीचार्जवरून जोरदार राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणीही पवारांनी केली आहे. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांना काही सवाल उपस्थित केले आहेत.

शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारले गेले. या हत्याकांडानंतरही त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांना आता जालना येथील घटनेवर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

Jalna Maratha Protest : आरक्षण कसं दिलं जातं हे माहितीये का? गिरिश महाजन पवार-ठाकरेंवर बरसले

अकोला येथे ते माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, शरद पवार गेली ४० वर्षे सत्तेत होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे तेच अनेकदा बोलले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला, तो सुप्रीम कोर्टात टिकविला आहे. परंतु, शरद पवारांचे लाडके उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने सरकारची बाजू मांडली नाही. तेव्हा शरद पवार हेच सरकारचे कर्ते-धर्ते होते, असाही टोला त्यांनी लगावला.

Jalna Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं…

दंगलीची भाषा करू नये

हा देश भगवान तथागत गौतम बुद्धांचा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी दंगलीची भाषा करू नये अशी अपेक्षा आहे. मोदीजींच्या काळात या देशात दंगली घडविण्याची कुणाचिही हिम्मत नाही. ते असेही बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us