शेगाव : आज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त नागरिकांनी गजानन मंदिरात गर्दी केली होती गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर प्रथमच यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. विविध प्रमुख मार्गातून आज गजानन महाराजांच्या दिंड्या निघाल्या आहेत. यावेळी भाविकांमध्ये मोठा हर्ष उल्हास दिसून आला.श्री संत गजानन महाराजांचे मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे.
संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिन सोहळा; विदर्भाची पंढरी भाविकांनी फुलली, शेगावात भक्तांची मांदियाळी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत नगरी शेगावात आज गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. यासाठी मोठ्या संख्येत भाविक शेगाव नगरीमध्ये दाखल झाले आहेत. शेगाव नगरीत भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याकरिता मागील 24 तासापासून मंदिर हे भाविकांच्या दर्शनाकरिता खुले आहे. सध्या जवळपास तीन ते चार तास भाविकांना दर्शनाकरता लागत आहेत. आज प्रकट दिनानिमित्त जयघोष होईल. यावेळी मंदिराच्या दिशेने भाविक फुलांचा वर्षाव करतात, ते क्षण डोळ्याचे पारणे फेडणारे असतात.
मंदिरात पारायण कक्षात शेकडो भावी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहेत. प्रगट दिन उत्सवानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान शहरातील ठिकठिकाणी महाप्रसाद वितरण करण्यात येते. विविध ठिकाणाहून आलेले भावी महाप्रसादाचा लाभ घेतात. शेगाव शहरात संत गजानन महाराज दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली आहे.
Sharad Pawar 83 व्या वर्षात सर्वात बिझी नेते
राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत. संतनगरी शेगावात पायी दिंड्या देखील गेल्या आठ दिवसापासून दाखल होत आहेत.
गण गण गणात बोतेच्या गजरात या पाय दिंड्या संत नगरी शेगावात दाखल झाल्या आहेत. आज शेगाव गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मोठा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये दर्शन बारीत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करीत भाविक शिस्तीत व शांततेत समाधीचे दर्शन घेत आहेत.