Sharad Pawar 83 व्या वर्षात सर्वात बिझी नेते
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) हे वयाच्या 83 व्या वर्षी ही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर प्रवास करत असतात. गेल्या चार दिवसांत एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल असा भरगच्च कार्यक्रम शरद पवार यांनी घेतले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर पवार यांनी मुंबई, नागपूर, नाशिक, वर्धा असा प्रवास केला आहे. ते ही चार दिवसांमध्ये, त्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलेच, त्याशिवाय इतर लोकांशी संवाद त्यांनी साधला आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पवार हे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत होते. या काळातही त्यांच्या युवकांशी, पक्ष कार्यकारिणीतील विविध भेटीगाठी सुरू होते. त्यानंतर शुक्रवारी ते नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ अधिवेशन, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अॅड. नितीन ठाकरे यांचा नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. त्यानंतर कादवा सहकारी साखर कारखान्यातील इथेनॉल आसवणी प्रकल्पाचे उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यासाठी विविध स्थळांना भेट दिली.
Raj Thackeray यांच्या ताफ्यात नवी कार Land Cruiser…लकी नंबर मात्र जुनाच
त्यानंतर शनिवारी ते मुंबई देशस्थ मराठा ज्ञातिधर्म संस्थेच्या नवी मुंबई येथील नूतन सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. काल (१२ फेब्रुवारी) रविवारी वर्धा आणि नागपूर येथे पवार यांनी दौरा केला. सकाळी आधी मुंबई ते नागपूर असा विमानप्रवास त्यांनी केला. तिथून त्यांनी वर्ध्यापर्यंत रस्त्याने प्रवास केला आहे. त्यानंतर सेवाग्राम येथे ग्रामसभा मेळाव्याला उपस्थित राहिले आहे. त्यानंतर वर्धा येथील संयुक्त व्यापारी समितीने आयोजित केलेल्या व्यापारी संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहून व्यापाऱ्यांना भेडसावणारे स्थानिक प्रश्न व मुद्द्यांवर पवार यांनी चर्चा केली. त्यानंतर सर्कस ग्राऊंड इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
या दौऱ्या दरम्यान पवार यांनी विविध व्यक्ती, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा साधली आहे. दमणे, थकणे, थांबणे या शब्दांशी पवार कधीही ओळख झाली नसावे, असे यातून दिसून येत आहे.