Raj Thackeray यांच्या ताफ्यात नवी Land Cruiser…लकी नंबर मात्र जुनाच
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यात दोन नव्या कारचा समावेश झाला आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. आतापर्यंत राज यांच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या कार होत्या. मात्र यावेळी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी आणि स्वत:साठी दोन कार खरेदी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या नवीन कारसाठी लकी नंबरचीच निवड केली आहे.
गेली अनेक वर्षे राज यांनी कार बदलली नव्हती. प्रदीर्घ कालावधीनंतर राज यांनी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. वाहनाचा रंग बदलला असला तरी नंबर प्लेटचं वैशिष्ट्य आजही कायम आहे. राज ठाकरे यांच्या वाहनाचा लकी नंबर 9 हा सर्वांनाच माहिती आहे. या क्रमांकाचे त्यांच्या आयुष्यातील महत्व सगळ्यांनाच ठावूक आहे. नव्या कारसाठीही राज यांनी 9 क्रमांकालाच पसंती दिली आहे. नेहमीप्रमाणे वाहनाचा क्रमांक हा देवनागरीत लिहिलेला आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी (Raj Thackeray New Car) टोयोटा कंपनीची लँड क्रूझर घेतली आहे. तर पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी टोयोटा वेल्फायर घेतली आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
सिड-कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलियाचा हटके लूक
दरम्यान राज ठाकरे यांच्याकडे याआधीही लक्झरी कार आहेत. यामध्ये प्रामूख्याने मर्सिडीजची सेडान कारचा समावेश आहे. ते नेहमी याच कारनं प्रवास करताना दिसत असतात. पण आता त्यांच्या ताफ्यात लँड क्रूझरचा समावेश झाला आहे.
9 नंबरवर विशेष प्रेम का? जाणुन घ्या
मनसेची स्थापना 9 मार्च 2006 रोजी झाली होती. आजवर त्यांच्या कारचा नंबरही 9 हाच राहिला आहे. राज ठाकरे यांचा हा लकी क्रमांक आहे. त्यांच्याकडे या आधी ज्या कार आहेत त्यांचा क्रमांक देखील 9 आहे. त्यामुळे यावेळी देखील त्यांनी याच लकी क्रमांकाची निवड केलीय.
जाणून घ्या कारच्या किंमती
राज ठाकरे यांनी स्वत:साठी घेतलेल्या टोयोटा लँड क्रूझरची (Toyota Land Cruiser) किंमत तब्बल 1 कोटी 47 लाखांपासून सुरु होते. तर शर्मिला ठाकरे यांची कार टोयोटा वेल्फायरची (Vellfire) किंमत 94 लाखांपासून सुरू होते.