Download App

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत, चंद्रपुरात खळबळ

  • Written By: Last Updated:

चंद्रपूर : चंद्रपुरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा पुतण्या आणि त्यांच्या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये संशयास्पद स्थितीत सापडला आहे. महेश हरिश्चंद्र अहिर आणि हरीश धोटे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, हंसराज अहीर यांचे पुतणे महेश हरिश्चंद्र अहीर व त्यांचा मित्र हरीश धोटे हे आठ ते दहा दिवसांपूर्वी चंडीगडला गेले होते. मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याने आठवड्यांपासून त्या दोघांचाही आपल्या घरच्यांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे घरातील सदस्य चिंतेत होते. त्यानंतर 15 मार्च रोजी महेश व हरीशच्या नातेवाईकांनी चंद्रपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत दोघांच्याही तपासाला सुरूवात केली. त्यानंतर काल (ता. 22) पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात यश आलं. चंदीगडच्या सेक्टर 36 पोलीस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी पोलिसांना संशयास्पद स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती सायंकाळी चंद्रपूरात पोहोचताच शहरात खळबळ उडाली.

कोरोना संक्रमितांची संख्या 4,46,99,418; कोविड धोरणाची 5 पट अमंलबजावणी करा; आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

या दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, महेश आणि हरीश यांनी आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दोन हजार किलोमीटर अंतरावरील विचित्र जंगलात किंवा दोघांनीही आत्महत्या केली असावी, यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. दोघांच्या मृतदेहाजवळ दारूची बाटली आणि काही ग्लास सापडले. त्यामुळे आत्महत्या असल्याचा संशय बळावला आहे.

Tags

follow us