कोरोना संक्रमितांची संख्या 4,46,99,418; कोविड धोरणाची 5 पट अमंलबजावणी करा; आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

कोरोना संक्रमितांची संख्या 4,46,99,418;  कोविड धोरणाची 5 पट अमंलबजावणी करा; आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली : देशात एकीकडे H3N2 व्हायरसचा धोका वाढत असतांनाच दुसरीकडं पुन्हा एकदा कोरोना (Corona) व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज नवीन कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता पाहता कुटुंब आणि आरोग्य मंत्रालयाने (ministry of family and health) गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘कोविड -19 चाचण्या, उपचार, प्रतिबंध आणि लसीकरण’ या धोरणाची 5 पट प्रभावी अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला.

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना काही निर्देस दिले. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी पाच पट अंमलबजावणी करा. कोरोनाची तयारी पाहण्यासाठी आम्ही आणखी एक मॉक ड्रिल आयोजित करू. लवकरच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येईल, असंही मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, सर्व राज्यांनी इन्फ्लूएंझा आणि कोविड -19 साठी आवश्यक असणारी औषधे आणि लॉजिस्टिकची उपलब्धता करावी, याशिवाय राज्यांना रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता करण्याचेही निर्देश दिलेत.

राजकारणात योगायोग नसतात; फडणवीस-ठाकरे यांना कोणाला मेसेज द्यायचाय ?
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना या सुनचा देण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 वर उच्चस्तरीय बैठक घेतली. यादरम्यान पंतप्रधानांना वाढत्या संसर्ग आणि इन्फ्लूएंझा प्रकरणांची माहिती देण्यात आली. या बैठकीत पंतप्रधानांनी कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. स्वच्छता राखण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. सर्व गंभीर तीव्र श्वसनाच्या आजारासाठी (SARI) प्रयोगशाळा चाचणी, जीनोम चाचणी आणि चाचणीच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची सूचनाही केली आहे.

 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात कोरोनाव्हायरस संसर्गाचे 1,300 नवीन रुग्ण आढळले. देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,46,99,418 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 7,605 वर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण हे आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.02% इतके आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79% इतका आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, एका दिवसातील नवीन प्रकरणांची ही संख्या गेल्या 140 दिवसांतील सर्वाधिक आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube