राजकारणात योगायोग नसतात; फडणवीस-ठाकरे यांना कोणाला मेसेज द्यायचाय ?

राजकारणात योगायोग नसतात; फडणवीस-ठाकरे यांना कोणाला मेसेज द्यायचाय ?

मुंबई : राजकारणातील एक मोठ्या घडामोडीने विधीमंडळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रसंग ही तेवढा खासच होता. राजकारणातील दोन दिग्गज आणि विशेषत: ज्यांच्या भोवती सध्या राज्याचं राजकरण फिरतयं आणि दोन्ही नेत्यात सध्या विस्तव जात नाही असे दोन नेते एकत्र आले. ते म्हणजे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray). हे दोन्ही नेते आज विधानभवन मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले. नुसतेच एकत्र आले नाहीत तर चालत-चालत दोन्ही नेते एकमेकांशी गप्पा मारत इमारतीपर्यंत आले.

खरंतर हे दोन्ही नेते समोर येणे आणि त्यात मीडियाच्या कॅमेरांचा गरडा पडणे साहजाजिकच आहे. मिडियासमोर असताना त्यांनी एकमेकांशी कानात गुजगोष्टीचे चित्र माध्यमांसमोर आणून ठेवले. दोन्ही हुशार नेते आहेत. कुणाला काय संदेश, कसा द्यावा हे दोघांना चांगलेच ठाऊक आहे. ही संधी दोन्ही नेत्यांनी साधली असल्याची चर्चा विधिमंडळात रंगली आहे.

वाचा : ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?

कारण हा योगायोग असला अस जरी गृहीत धरलं तर ते शक्य वाटत नाही. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. ते गाडीतून उतरले. त्याचवेळी त्याना समजलं की उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी सभागृहाकडे न येता गेटवर थांबणे पसंत केले. काही सेकंदातच देवेंद्र फडणवीस यांचा ताफा देखील प्रवेशद्वाराजवळ आला. त्यानंतर हे दोन्ही नेते विधानभवनाच्या मुख्य द्वारापासून चालत आणि गप्पा मारत एकत्र आले.

सध्या दोन्ही नेते अडचणीत आले आहेत. उद्धव ठाकरे यांची पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी लढाई सुरू आहे. तर उपमुखमंत्री फडणवीस यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी छुपा संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेबाबात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभुमीवर झाल गेलं विसरू या हा केंद्रीय भाजप नेतृत्वासाठी संदेश आहे का? असाही एक कयास या दोन्ही नेत्यांच्या भेटीनिमित्ताने लावला जात आहे.

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांनी कोंडी केल्याचीही चर्चा रंगताना दिसत आहे. अनेक महत्वाच्या फायलींवर सह्या होत नाहीत. हा मुद्दाही आहेच तो पाहता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा शिंदेना इशारा आहे का ?  असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिलाय का? आम्ही एक होऊ शकतो. तुम्ही संभाळून राहा हा संदेश आमदारांसाठी तर नाही ना ही सुद्धा एक बाजू आहेच.

त्याचबरोबर आगामी निवडणुकीत जागा वाटपात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकण्याचा एक भाग होता का ? अशा अनेक बाजू फडणवीस-ठाकरे यांच्या आजच्या भेटीच्या निमित्ताने समोर येऊ लागल्या आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेते काहीच न बोलताही निघून जाऊ शकले नाहीत. काहीतरी बोलले. पण या माध्यमातून त्यांना निश्चितच एक संदेश द्यायचा होता का, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube