गुरुकुंज (मोझरी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ५४वे पुण्यतिथी पर्व नुकतेच संपन्न झाले. या पुण्यतिथी पर्वानिमित्त देश विदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी तुकडोजी महाराजांना गुरुकुंज आश्रमात मौन श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरही उपस्थित होत्या. संपूर्ण देशभरातही तुकडोजी महाराज आणि त्यांच्या विचारांना मानणाऱ्या भाविकांनी अशाच पद्धतीने अत्यंत शिस्तीत एकाच वेळी मौन श्रद्धांजली अर्पण केली.
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५४व्या पुण्यतिथी पर्वावर देशविदेशातील कानाकोपऱ्यातून गुरुकुंज मोझरीत आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर सर्वधर्म प्रार्थनेत सहभागी होऊन, या भारतात बंधुभाव नित्य वसु दे-मतभेद नसू दे कि कामना भाविकांनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या चरणी केली, अशी भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
Maharashtra Budget 2023 : घोषणांचा पाऊस; पंचांमृताद्वारे फडणवीसांनी फुंकले 2024चं रणशिंग!
एक दिन सारा जगत गुरुदेव सेवामंडल की शिक्षा और दिक्षा पायेगा या राष्ट्रसंतांच्या भाकितानुसार अमेरिका, कॅनड, इंग्लंड, जॉर्जिया, दक्षिण आफ्रिका या देशांतील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक आणि विदेशी नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू होण्याआधी काही वेळासाठी येथील सर्व व्यवहार, रस्त्यांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होते. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावर तयार होऊन एक शांतता पसरली होती.