अकोला : खरीप हंगामाला (Rainy season) सुरुवात होण्याआधीच शेतकऱ्यांच्या पसंतीच्या कपाशी बियाण्याचा (Cotton seed) तुटवडा पडून, बहुतांश शेतकरी या बियाण्यांपासून वंचित राहत आहेत. स्टॉक संपला, जिल्ह्यात सुमारे या बियाण्याचे दीड लाख पॉकीटे उपलब्ध करुन दिले असून, आता पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे बियाणे निर्मात्या कंपनीकडून स्पष्ट केले जात असल्याचे सांगितले जात आहे. लगतच्या जिल्ह्यातून आणलेले बियाणेदेखील संपले असल्याचे दाखविले जात आहे. दरम्यान, या बियाण्याची विक्री कृषी विभागाच्या देखरेखीखाली नियंत्रणात होत असली तरी अधिकृत विक्रेत्यांकडे बियाणेच नसल्याने सांगितले जात असून, कृषी विभागही (Department of Agriculture) हतबल असल्याचे चित्र आहे. (End of seed early in the season of preferred cotton seeds many farmers scrambling for seeds)
https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M
खारपाणपट्ट्यात तसेच कोरडवाहु क्षेत्रात कपाशीचे अजित-१५५ हे संकरीत वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. लागवडखर्च आणि त्याच्या उत्पादनात ताळमेळ बसत असून, दरही बऱ्यापैकी मिळत असल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या बियाण्याचा पेरा करीत असल्यामुळे याची मागणी असून, शेतकरी आग्रही आहेत. दरम्यान, खरीपाच्या नियोजनात अधिकृत विक्रेते कंपनीकडे या बियाण्याची नोंदणी करतात. गतवर्षीचा स्टॉक
आणि त्याची झालेली विक्री यावरुन या बियाण्याची नोंदणी केली जाते. दरम्यान, यंदाही गतवर्षीच्या नोंदणीनुसार या बियाण्याची नोंदणी केली. कंपनीकडून त्याचा पुरवठाही करण्यात आला. परंतु, हंगामापूर्वीच या बियाण्याचा तुटवडा पडला. आता तर हे बियाणे शेतकऱ्यांना मिळणे दुरापास्तच झाले आहे.
आझाद यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी; विरोधकांना डिवचत आठवले म्हणाले, पुन्हा मोदीच PM
नोंदणी व उपलब्ध झालेल्या बियाण्याची विक्री झाली. आता आमच्याकडे बियाणे नाहीत, असे अधिकृत विक्रेते सांगत आहेत. विक्री केलेल्या बियाण्याचा हिशेबदेखील कृषी विभागाला देत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर कंपनीकडून जिल्ह्याला या बियाण्याचे सुमारे दीड लाख पॉकीटे उपलब्ध करुन दिल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे.
लगतच्या जिल्ह्यातूनही आणले बियाणे
अनेक कृषी सेवा केंद्रांनी अन्य जिल्ह्य या बियाण्याचा तुडवडा निर्माण झाल्यानंतर अतिरिक्त असलेले बियाणे खरेदी करुन त्याची पारदर्शकतेने विक्री केली. परंतु, आणलेले बियाणेदेखील संपले असून, आता हे बियाणे मिळणे शक्यच नसल्याचे कृषी सेवा केंद्र संचालकांचे म्हणणे आहे.
अतिरिक्त बियाणे तुटवडा कसा?
दरवर्षी जिल्ह्याला या बियाण्यांच्या दीड लाख पॉकीटाची उपलब्धता करुन देण्यात येते. इतके बियाणे पुरेसे होत असून, हंगामातील लागवडीपर्यंत हे बियाणे सहज उपलब्ध होत आले आहेत. परंतु, बियाणे विक्रीच्या परवानगीनंतर काही दिवसातच तुटवडा पडला. त्यामुळे हा कृत्रिम तुटवडा असून, यामध्ये विक्रेत्यावर शेतकरी संशय घेत आहेत. हे बियाण्याची लिंकींग वा ऑवर विक्री होत असल्याचे आरोपही शेतकरी करीत आहेत.
कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली विक्री
या बियाण्याच्या तुटवड्याला गांभीर्याने घेतले असून, प्रत्येक विक्रेत्यांकडील स्टॉक व झालेली विक्री याची पडताळणी केली जात आहे. या बियाण्याच्या अधिकृत विक्रेत्याच्या केंद्रावर कृषी विभागाचे कर्मचारी तैनात केले असून, त्याच्या निगरानीखाली, नियंत्रणाखाली या बियाण्यांची शेतकऱ्यांना विक्री सुरु आहे. लिकींगचे प्रकार होऊ नये म्हणून कृषी विभाग सतर्क आहे. तर कंपनीकडे बियाण्याची मागणी केली; परंतु, स्टॉकच नसल्याचे कंपनीकडून उत्तरे येत आहेत, असं महेंद्र सालके, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी सांगितलं.