Download App

आझाद यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी; विरोधकांना डिवचत आठवले म्हणाले, पुन्हा मोदीच PM

  • Written By: Last Updated:

पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad) यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. सहारनपूरमधल्या देवबंद इथं आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathawale)यांनीही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली. (Strict action should be taken against the attackers of Chandrasekhar Azad Ramdas Athawale said to the opposition Modi is the PM again)

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागते. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी असं आठवले म्हणाले.

भारत विरुध्द पाकिस्तान सामना भारतात होणार; मंत्री उदय सामंत काय म्हणाले? 

यावेळी आठवलेंनी रिपाईला मंत्रिपद देण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुंबईत युती पक्षांची बैठक झाली असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद देण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी विधानपरिषदेत एक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीतील आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. पण जिथे दलित वस्ती नाही तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचे रोटेशन थांबवण्याची मागणी केल्याचं आठवलेंनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात देशातील विरोधक एकवटले आहेत. मात्र, याचा कोणताही परिणाम होणार नाही. मोदी हे लोकप्रिय आणि सक्षम नेते आहेत. येत्या निवडणुकीत 350 हून अधिक जागा जिंकून मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. विरोधक जेवढे एकजूट होतील, तितकी मोदींची ताकद वाढेल, असं आठवले म्हणाले.

मराठा आरक्षणावर भाष्य करतांना आठवले म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना वेगळे आरक्षण द्यावे, असं आमचं मत आहे.

ते म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले काम करत आहे, मी त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे-फडणवीस त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून पुढील पाच वर्षे सत्तेत असतील. यावेळी बोलतांना त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र डागलं. प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणं योग्य नव्हतं. त्यांना दर्शन घ्यायचे असेल तर चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांचे आणि रायगडला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे, असं आठवले म्हणाले.

Tags

follow us