भारत विरुध्द पाकिस्तान सामना भारतात होणार; मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

भारत विरुध्द पाकिस्तान सामना भारतात होणार; मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

Uday Samant : भारताचा यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) च्या वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार, आपला क्रिकटेमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबतच सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळल्या जाणार आहे. दरम्यान, विश्वचषक खेळण्यास पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्यानं टीका केली जाते. भारत विरुध्द पाक हा सामना भारतात व्हावा, हे न पटणार असल्याचं सांगत भाजप-सेनेनं आपली भूमिका स्पष्ट करावी, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. दरम्यान, यावर आता आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Uday Samant on Indik-Pak Match ICC World Cup 2023)

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज ठाकरे यांच्याशी या सामन्यासंदर्भात बोलतील आणि निर्णय घेतील. राज ठाकरेंची भूमिका काय होती, हे मी ऐकलं नाही. संदीप देशपांडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावर मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राज ठाकरेंशी सविस्तर चर्चा करून त्यांची नेमकी काय भूमिका आहे? ते समजून घेतील आणि नंतर काय तो निर्णय घेतली, असं सामंत म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेतील भष्ट्राचारात कारवाई करणारच; फडणवीसांनी ठाकरेंना घेरले
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतातच खेळला जावा, हे अजिबात न पटणार आहे. यावर संदीप देशपांडेच्या प्रतिक्रियेवर सामंत बोलत होते. दरम्यान, मुंबई महानगरापालिकेतील ठेवी संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरही सामंत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आचम्या शुभेच्छा आहेत त्यांना मोर्चासाठी. खरंतर आमची लढाई देखील भ्रष्ट्राचाराविरुद्धच आहे. त्यामुळं त्यांनी आमचं समर्थन करावं. आज सकाळी ९.३० वाजता प्रेस कॉन्फरन्स झाली नाही वाटतं, असं म्हणत राऊतांना डिवचलं.

केसीआर महाराष्ट्रात हळूहळू हातपाय पसरू लागले. दोन दिवसांपूर्वीच केसीआर आपल्या सहाशे गाड्यांच्या ताफ्य़ासह महाराष्ट्रात आले होते. यावेळी भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यावर सामंत म्हणाले की, के. चंद्रशेखर राव हे तेलंगणात जास्त परदेशी गुंतवणूक आणली असं खोट चित्र निर्माण करत आहेत. ते महाराष्ट्रात लक्ष घालत आहेत. त्यांना वाटतं की, इथं त्यांना फायदा होईल. पण, तिकडे तेलंगणात त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, तिकडे त्यांच्या पक्षातील नेते बाहेर पडत आहे, असा खोचक टोला लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube