मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारात कारवाई करणारच; फडणवीसांनी ठाकरेंना घेरले

  • Written By: Published:
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारात कारवाई करणारच; फडणवीसांनी ठाकरेंना घेरले

Devendra Fadanvis On Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारला वर्षापूर्ती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसांपासून वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. गुरुवारी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दूरदर्शनला सविस्तर मुलाखत दिली. त्यात त्यांनी शिंदेंबरोबर सरकार स्थापन करणे ते मुंबई महानगरपालिकेली भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले आहे. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारात कारवाई करणारच असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. (devendra-fadanvis on uddhav thackeray bmc corruption)

अर्धसत्य तोंडावर आले, गुगली टाकून पूर्णसत्य बाहेर आणणार ! फडणवीसांचे शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड काळात डॉक्टर आणि पेशंट बनावट संख्या, मास्क, शवपेटी, कफन, प्लास्टिक बॅग यांच्यात मोठा घोटाळा झाला आहे. जवळपास हा घोटाळा हा बारा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या घोटाळ्यात जे दोषी असतील त्यावर करवाई केली जाईल. या घोटाळ्यात भाजप माजी खासदार किरीट सोमय्या तसेच इतर भाजपा नेत्यांकडूनही आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे टार्गेट आहेत. त्याबाबत गंभीर आरोप भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. हे पाहता फडणवीस यांच्या रडारवर थेट उद्धव ठाकरे हेच आसल्याचे दिसते.

पोलीस पाटील, कोतवाल पदभरती घोटाळ्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह दोन बडे अधिकारी निलंबित

यापूर्वी आम्ही मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत होते. प्रत्येक वेळी त्यांना महापौरपद आम्ही दिलंय. त्यावेळी आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले, या भ्रष्टाचारच्या दलदलीत तुमच्यापासून लांब राहू. त्या प्रमाणे आम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचारापासून लांब राहिले, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी दूध देणारी गाय आहे, असा टोमणा ही फडणवीस यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंबरोबर आता मैत्री नाही

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता कधीही मैत्री नाही.
आगामी काळात काही झाले तरी ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राजकारणात कोणी-कोणाचे मित्र किंवा शत्रू नसतात. हे पाहता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत मैत्री कराल का ? यावर देवेंद्र फडणवीस हे उत्तर दिले. आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणार नाहीत. शरद पवार आमच्यासोबत येणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube