Devendra Fadnavis : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) विदर्भात होत असताना विदर्भातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. मात्र, सरकारने २० डिसेंबर रोजी सायंकाळी अधिवेशन संपवण्याचा निर्णय घेतला, सरकारला विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही. त्यांना विदर्भाचा प्रश्न सोडवायचा नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषेदेत जोरदार पटलवार केला.
‘हिरे उद्योग सुरतला’फडणवीसांनी खरं काय ते सांगून टाकलं; म्हणाले, ‘ही माहिती..,’
अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्यांवर उत्तरे देतांना फडणवीस यांनी विदर्भाच्या प्रश्नावरून विरोधकांना जोरदार चपराक लगावली. आज विधान परिषेदेत बोलतांना फडणवीस म्हणाले की, विदर्भाबाबत चर्चा करण्यासाठी, विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असते. मात्र, विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भासंदर्भातील चर्चाच समोर आली नाही. विरोधकांना विदर्भच्या प्रश्नांचा विसर पडलेला दिसतो, नागपुरातील अधिवेशन हे नागपूर करारानुसार होते. आता 10 दिवस/11 दिवस असे बोर्ड लावतात. पण आधीच्या सरकारने तर 2 वर्ष अधिवेशनच घेतले नव्हते, असं फडणवीस म्हणाले.
रेल्वे विभागात 3000 हून पदांसाठी भरती सुरू, १० वी पास, आयटी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज
ते म्हणाले, आधीच्या सरकारने तर 2 वर्ष अधिवेशनच घेतले नव्हते. त्यामुळे मुळात अधिवेशन अधिक काळ झालं पाहिजे, शंकाच नाही. त्या अधिवेशनात सहभाग असला पाहिजे. चर्चा झाली पाहिजे, हे तितकेच महत्त्वाचे आहे. या अधिवेशनात विदर्भाच्या विकासाचा प्रस्ताव येईल, अशी आम्हाला आशा होती पण तो आला नाही. सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला आहे. प्रवीण दरेकर आणि मनीषा कायंदे यांचे मी अभिनंदन करतो, असं ते म्हणाले.
आता आर्थिक अनुशेष संपला-
आता विदर्भाचा अुषशेष संपला आहे. म पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे जेव्हा हा प्रश्न मांडला, तेव्हा बळीराजा जलसंजीवनीच्या माध्यमातून त्यांनी मोठी मदत केली. 80% प्रकल्प हे विदर्भातील होते. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असं फडणवीस म्हणाले.
विदर्भातील प्रकल्पांचा आढावा
यावेळी बोलतांना फडणवीसांना विदर्भातील प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, विदर्भातील वेगाने पूर्ण व्हावेत, याकरत मागच्या काळात काम सुरू झालं. जुलै 2022 नंतर 32.14 दलघमी पाणीसाठा निर्माण केला. 29 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. धरण आणि कालव्याच्या दुरुस्तीचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला. वैनगंगा-नळगंगा हा 88,000 कोटींचा प्रकल्प क्रांति करणारा प्रकल्प ठरणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता घेण्यात येईल. जिगाव प्रकल्पाला मोठा निधी दिला. त्यातून बुलढाणा जिल्ह्यात मोठा लाभ त्यामुळे होणार आहे.
रोजगार निर्मिती होणार
राज्यात नवीन सरकार आल्यावर विदर्भात सव्वीस आणि अतिविशाल प्रोजक्टसाठी 50,595 कोटी रुपयाचे देकार पत्र दिले. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. कोनसरीच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा गुंतवणूक येते आहे. योग्य लक्ष दिले तर एकटा गडचिरोली जिल्हा राज्याला 50,000 कोटींचा महसूल देईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं. नागपुरात सौर ऊर्जेसाठी ₹18,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. लोणार सरोवराच्या विकासासाठी 91 कोटी रुपये मंजूर केले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी तयार करतो आहोत. त्यासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. यंदा धानाला 20,000 रुपये बोनस जाहीर केला. 1400 कोटी रुपये त्यासाठी देण्यात येणार आहे. गेल्यावेळी 15,000 रुपये बोनस दिला होता. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
विदर्भातील ज्या जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज नव्हते, त्या सर्व जिल्ह्यांना दिले. LIT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. अमरावती जिल्ह्यात मराठी विद्यापीठ तयार होत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.