जळगाव : गुलाबराव पाटलाच्या नादी कुठे लागता, मी संजय राऊतला घाम आणतो, या शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना खोचल टोला लगावलाय. गुलाबराव पाटील जळगावात विविध कामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
नव्या 'प्लू'चे कोणती लक्षणे?…वाचा#Corona #ICMR #IMA #Hospitalhttps://t.co/kiEeg7Mf6B
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 5, 2023
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, दोघेही बाप-बेडे गाड्यांवर गर-गर फिरत असतात. काय तर म्हणे गुलाबराव असा अन् गुलाबराव तसा हे दोघे कुठेही जातात अन् फोटो काढत असतात. मयतीच्या ठिकाणाही गेले तरी तिथं फोटो काढून टाकतात. आता सध्या व्हॉट्सअपचा जमाना आहे. गेले तिकडे की फोटो काढून टाकत असल्याचंही त्यांनी म्हटंलय.
विंडोजचं नवं फिचर्स आलं…#Windows #Micorsoft #windows11https://t.co/tn9iMlNMVs
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 5, 2023
तसेच पाटलाच्या नादी कुठं लागता, मी बारक्यांशी लढाई करीत नसून संजय राऊतसारख्या माणसाला मी घाम आणत असल्याचं ते म्हणाले. गुलाबराव पाटील हा छोटा माणूस नाही
मी सभागृहात उभा राहिलो तर असं वाटतंय की क्या करेगा अन् क्या नही करेगा, या शब्दांत त्यांनी विरोधकांना चांगलंच खडसावलंय.
ED Raid : ईडीविरोधात हसन मुश्रीफांनी दंड थोपटले…
दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांसाठी पाण्याच्या योजना मंजूर केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच जळगावमधील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या आता राहणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून गुलाबराव पाटलांचा सत्कार करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यामध्ये धुमश्चक्री होत असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे खोके सरकार म्हणून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. अशातच गुलाबराव पाटलांनी आता थेट ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांवर जोरदार टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.