चंद्रपूर येथील महापौर पदासाठी मोठा घोडेबाजार (Chandrapur) होण्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांजी घणाघाती आरोप केले आहेत. भाजपने पदासोबतच प्रत्येकी 1 कोटी रुपये अशी ऑफर नगरसेवकांना दिली आहे असा थेट हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच, दोन्ही बाजूने संख्याबळासाठी प्रयत्न सुरू आहेत. उबाठा, वंचित आणि दोन अपक्ष अशी जुळवाजुळव सुरू आहे. मात्र हायकमांडचा आदेश मी पाळणार आहे असंही ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी सच्चा काँग्रेस कार्यकर्ता आहे. शेवटी भाजपने कितीही दावा केला तरी महापौर काँग्रेसचाच होईल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. माझ्यासाठी कुठलंही पद, सत्ता महत्वाची नाही तर काँग्रेस पक्ष महत्वाचा आहे. त्यांनी पुढे केलेल्या गट नेत्याबाबत आमचं एकमत नव्हतं. आमचे काँग्रेसचे 27 आणि पप्पू देशमुख यांच्यासोबतच 3 असे 30 सदस्यांचे संख्याबळ असलं तरी आणखी 4 सदस्य लागणार आहेत. ते आपल्याकडे आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यासंदर्भात बहुमतासाठी लागणाऱ्या 4 सदस्यांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी घेतली आहे, असंही ते म्हणाले.
चंद्रपूरमध्ये खासदार आणि आमदारांमध्येच जुंपली; विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर संघर्ष शिगेला
यासोबतच स्थायी समिती माझ्या गटाला मिळणार असून महापौर पदासाठी खासदार धानोरकर यांचा अट्टाहास असल्याचा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यावर नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन गट नोंदणी केली यावर कुणाचा तरी फोन आला होता, असा आरोप केला जात असला तरी आपल्याकडं पुरावा नसल्याने आपण याबाबतीत काही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
वाद काय?
वडेट्टीवार यांची चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोकर यांनी चांगलीच कोंडी केली. चंद्रपूरचा महापौर आणि गटनेता ठरवण्याचा खासदारांच्या निर्णयाला त्यांना संमती द्यावी लागली. एवढंच नव्हे तर कोणी शिवी दिली ती ऐकून घेण्याची तयारी दर्शवून त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
चंद्रपूरमध्ये महापौर कोणाचा यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. या वादावर प्रदेशाध्यक्षांनी तोडगा काढला आहे. मात्र, आता धानोरकर यांना बहुमतासाठी लागणार आकडा गाठून देण्याची अवघड जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने तिकीट कापलेले दोन बंडखोर निवडून आले आहे. ते वडेट्टीवार यांच्यासोबत आहेत. महापौरपदाचा उमेदवार बघून त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
