India first AI car : ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) या बिझनेस रियालिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये यवतमाळ (Yavatmal) येथील हर्षल महादेव नक्शने या तरुणाने आलिशान कार (AI car) सादर केली. लहानपणापासून कार बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षलने ‘एआय कार्स’ शार्क्ससमोर ठेवली. AI कार्स ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायड्रोजन आधारित वाहन तयार करणारी स्टार्टअप कंपनी आहे.
हर्षलला वयाच्या 19 व्या वर्षापासून कार बनवण्याचे वेड होते. अवघ्या 18 महिन्यांत त्यांनं घराच्या मागे एक छोटेसे गॅरेज सुरू केले. त्यात एक कार बनवली होती. त्यासाठी त्याने 60 लाख रुपये खर्च केले. यासाठी त्यांने कुटुंबीय आणि मित्रांकडून आर्थिक मदत घेतली. इतर व्यवसायातून मिळणारे उत्पन्नही त्यांने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्च केले.
हर्शेलने तयार केलेल्या कारमध्ये हायड्रोजन इंधन सेल वापरल्या आहेत. इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी साधारणत: 5 ते 6 तास लागतात. हायड्रोजन इंधन भरण्यासाठी फक्त 3 ते 5 मिनिटे लागतात. यानंतर कार 1000 किमी अंतर कापते. हर्षलने दावा केला की त्याची कार पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि भारतीय रस्त्यावर स्वयंचलितपणे चालवू शकते.
Poonam Pandey: पूनम पांडेच्या मृत्यूची खोटी बातमी आखणाऱ्या कंपनीने थेटच सांगितलं; म्हणाले…
हर्षलने त्याच्या कारमध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी पाचपैकी तीन शार्क्सना घेतले. नार्मल सेल्फ-ड्रायव्हिंग कारमधील AI रस्त्यावरील लेन पाहून कार्य करते. हर्षलची कार सिस्टीम भारतीय रस्ते लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात इमर्जन्सी ब्रेकसारख्या सुविधाही आहेत. परदेशी कंपन्या लिडारचा वापर करतात. हर्षलची कार थ्रीडी कॅमेरा आणि अल्ट्रासॅनिक सेंटरच्या मदतीने काम करते. टेस्लाने अलीकडेच थ्रीडी कॅमेरे वापरण्यास सुरुवात केली आहे. पण तरीही त्यांची यंत्रणा समोरची वस्तू प्लास्टिकची आहे की दगड हे ओळखू शकत नाही. हर्षल म्हणाला, पण माझ्या कारची AI सिस्टीम ती ओळखण्यास सक्षम आहे.
ऑटो सेक्टरमध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने हर्षलने त्याच्या स्टार्टअपसाठी 4 टक्के स्टेकच्या बदल्यात 2 कोटी रुपयांची मागणी केली. पण कोणत्याही शार्कने त्याला ऑफर दिली नाही. सर्व शार्कने हर्षलच्या मेहनतीचे आणि महत्त्वाकांक्षेचे कौतुक केले. मात्र त्यासाठी पुरेशा मूलभूत सुविधा देशात नाहीत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल आणि देशात पुरेशी हायड्रोजन इंधन केंद्रे नसताना तो कितपत फायदेशीर ठरेल याविषयी शार्कने प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या.
‘क्राईम अन् सस्पेन्स…”मर्डर मुबारक’चा धमाकेदार टीझर रिलीज! ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
हर्षलची मेहनती वृत्ती आणि सर्जनशीलतेचे सर्वांनी कौतुक केले. परंतु शार्क्सने म्हटले की त्याच्या प्रयत्नांना प्रत्यक्षात यश मिळण्याची आणि पैसा मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे त्याला नोकरी करण्याचा सल्ला दिला. ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी शोध आणि तुझ्या कौशल्याचा आणि ज्ञानाचा कंपनीसाठी वापर कर. स्वतः काहीतरी करण्याऐवजी कंपनीसाठी काम कर. आता तू दोन कोटी रुपये मागत आहेत पण तुझ्या प्रयोगासाठी करोडो रुपये लागतात, असे शार्कने सांगितले.
Pragya Kapoor: चित्रपट निर्मात्या प्रग्या कपूर हिने लाँच केला इको-फ्रेंडली फॅशन ब्रँड