Download App

Khamgaon-Malkapur accident : रस्त्याच्या कडेला गाढ झोपेत असतांना ट्रकने चिरडले, चौघांचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

बुलढाणा : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे (accident) प्रमाण वाढत आहे. आताही बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर खामगाव-मलकापूर (Khamgaon-Malkapur accident) दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकने महामार्गाच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला झोपलेले सर्व लोक मजूर होते. जखमी मजुरांवर मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात (Malkapur Government Hospital) उपचार सुरू आहेत. (Speeding Truck Hit Labors)

Shyamchi Aai: दिवाळीत भेटायला येणार श्यामची आई, पहिलं पोस्टर समोर 

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरजवळील वडनेर भोलजी गावाजवळ मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले. हे सर्व कामगार महामार्गाच्या कडेला झोपले होते. पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाला. या अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात सहा मजूर जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असून सर्वांवर मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामासाठी आलेले होते.

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. या भीषण अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shyamchi Aai: दिवाळीत भेटायला येणार श्यामची आई, पहिलं पोस्टर समोर 

प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी या अपघातातील तीन मृतांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृताची ओळख पटवली जात आहे.

या भीषण अपघातामुळं संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने सर्वांना मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

हा अपघात झाल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहूतक कोंडी झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करून वाहनांना वाट मोकळी करून दिली आहे. पोलिसांनी आता या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Tags

follow us