Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) निकाल जाहीर झाले असून राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं. विदर्भात महाविकास आघाडीने अत्यंत चांगली कामगिरी केली. विदर्भातील अमरावती, गडचिरोली वर्ध्यासह अनेक जागांवर महाविकास आघाडीने कडवी झुंज देत विजय मिळवला.
Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?
अकोला-अनुप धोत्रे (विजेते)
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या चुरशीची लढतीत भाजपचे अनुप धोत्रे यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. अनुप संजय धोत्रे तब्बल 40 हजार 12 मतांनी विजयी झाले.
अमरावती- बळवंत वानखेडे (विजेता)
अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडेंनी नवनीत राणांना पराभवाची धूळ चारली आहे .बळवंत वानखडे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव केला. वानखडे यांना 5 लाख 26 हजार 271 मते मिळाली, तर नवनीत राणा यांना 5 लाख 6 हजार 540 मते मिळाली.
मोदी सरकार नव्हे तर, NDA सरकार; बहुमताला हुलकावणी मिळताच मोदींची भाषा बदलली
गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजेते)
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले भाजप खासदार अशोक नेते यांना यंदा हॅट्ट्रिक करता आली नाही. या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. या मतमोजणीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे 1 लाख 40 हजार 234 मतांनी विजयी झाले.
चंद्रपूर – प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)
चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर 2 लाख 60 हजार 410 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. धानोरकर यांना 7 लाख 18 हजार 410 तर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 4 मते मिळाली. उर्वरित 13 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. धानोरकर विदर्भात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले.
बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा विजयी झाले. 29 हजार 376 मतांच्या आघाडीने ते विजयी झाले. जाधव यांना 3,48,238 मते मिळाली, तर शिवसेनेच्या उबाठाचे नरेंद्र खेडेकर यांना 3,18,862 मते मिळाली.
भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या लढतीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसने ही जागा काबीज केली आहे. पडोळे यांचा विजय निश्चित दिसताच काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजेता)
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा पराभव केले. देशमुख हे 94 हजार 473 मतांनी विजयी झाले.
रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
रामटेक लोकसभा मतदरासंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्यामकुमार दौलत बर्वे हे विजयी झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिदें गटाचे उमदेवार राजू पारवे यांचा पराभव केला.
वर्धा – अमर काळे (विजय)
वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची खासदारीकीची हॅट्रीक होण्याची संधी हुकली. सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या तडस यांचा शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळेंनी पराभव केला.
नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अखेरच्या फेरीत गडकरींना 1.25 लाख मतांना आघाडी मिळवत कॉंग्रेसच्या विकास ठाकरेंचा दणदणीत पराभव केला.