Download App

Sharad Pawar गौप्यस्फोटावर महाजनांचा पलटवार, ‘देशमुखांनाच भाजपमध्ये येण्याची इच्छा’

वर्धा: अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्ध्यात केलं होतं. ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. आर्थर कारागृहात डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. यावर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पलटवार केला आहे.

शरद पवारांचा गौप्यस्फोट नेमका काय होता?
‘अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांवर १३० वेळा धाडी घातल्या जातात, देशात असा प्रकार कुठेही घडला नाही. अनिल देशमुख यांना एकच सांगितले जात होते की, ‘तुम्ही पक्ष बदला, तुम्ही विचार बदला, तुम्ही नेतृत्त्व बदला’. पण त्यावेळी अनिल देशमुख यांनी स्वच्छ मनाने सांगितले की, मी संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवेन, पण माझ्या पक्षाची साथ सोडणार नाही. अनिल देशमुख यांनी ती ऑफर धुडकावून लावल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला’, असे शरद पवार यांनी म्हटले.

अनिल देशमुख यांनीही अनुभव कथन केले
यावेळी अनिल देशमुख म्हणाले, ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. पण त्यावेळी मी बाहेर पडलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच पडले असते. माझा साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. मी आयुष्यभर जेलमध्ये जाईन, पण समझोता करणार नाही, असे त्यावेळी सांगितले. आर्थर कारागृहात जेथे दहशतवादी कसाबला डांबले होते, तेथेच डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोटही अनिल देशमुख यांनी केला.

Politics : केसीआरच्या पक्षाला महाराष्ट्रात कोण देणार हात ? ‘या’ नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा

गिरीश महाजन यांचा पलटवार
‘आम्ही अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता. उलट अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दोनवेळा आम्हाला तसा प्रस्ताव पाठवला होता. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. अनिल देशमुख यांची आताही जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे निर्दोष असल्याचे पुरावे आणि कागद त्यांनी ईडीला दाखवावेत’, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला.

Tags

follow us