Download App

उमेदवारी दोन मिनिटांनी हुकली; माजी मंत्री पुन्हा करणार काँग्रेसमध्ये वापसी

अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये येतील.

Maharashtra Elections 2024 : नागपूर मध्य विधासभा (Nagpur News) मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अनीस अहमद यांना तिकीट दिले होते. परंतु, फक्त दोन मिनिटांचा उशीर झाला अन् अहमद यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. माजी आमदार आणि मंत्री राहिलेल्या अनीस अहमद काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु, काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. म्हणून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित आघाडीत प्रवेश केला होता. आता मात्र त्यांनी वंचित आघाडीची साथ सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत अनीस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये वापसी करणार आहेत.

फक्त दोन मिनिटांचा उशीर अन् संधी हुकली; माजी मंत्र्याची धडपड व्यर्थ, अर्ज राहिला हातातच

नेमकं काय घडलं होतं ?

माजी आमदार आणि मंत्री राहिलेल्या अनीस अहमद काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु, काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं नाही. तरीदेखील कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार त्यांनी केला होता. यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आघाडीने त्यांना नागपूर मध्यमधून उमेदवारी जाहीर केली.

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्यासाठी अनीस अहमद पोहोचले सुद्धा होते. अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना देईपर्यंत तीन वाजून दोन मिनिटे झाली होती. अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतच होती. दोन मिनीट उशीर झाल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी नामांकन कक्षाचा दरवाजा बंद केला. त्यामुळे अनीस अहमद यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नव्हता.

दरम्यान, आता अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये (Congress Party) परतण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी (Maharashtra) रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत बहुतेक आजच ते काँग्रेसचा झेंडा हाती घेतील अशी शक्यता आहे.

Congress Third List : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, अंधेरीमधून सचिन सावंत निवडणुकीच्या रिंगणात    

follow us