Download App

‘स्वाभिमानाच्या विरोधात काम करू शकत नाही’; भर कोर्टातचं न्यायमूर्तींचा राजीनामा

Nagpur : नागपूर खंडपीठात आज एक आश्चर्यकारक घटना घडली. बदलीमुळे व्यथित होत न्यायमूर्तींनी चक्क कोर्टरुममध्येच राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आज कोर्टरुममध्ये आले. येथे उपस्थितांशी बोलताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी राजीनामा देत आहे, माझ्यामुळे जर कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत न्यायमूर्ती रोहित देव यांनी राजीनामा दिला.यावेळी सभागृहातील उपस्थित सर्वच स्तब्ध झाले.

Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप

न्यायमूर्ती देव यांचा कार्यकाळ अजून शिल्लक होता. दीड ते दोन वर्षांनंतर ते निवृत्त होणार होते. डिसेंबर 2025 पर्यंत ते कर्तव्यावर राहणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. बदलीमुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी राजीनामा का दिला याचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. जून 2017 मध्ये न्यायमूर्ती देव यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती होते. यानंतर आज मात्र आज त्यांनी थेट राजीनामाच दिला.

काल त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आल्याची सूचना प्राप्त झाली होती. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे, असे एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. नागपूर खंडपीठातून त्यांची बदली करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळेच व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिला का अशी चर्चा सुरू असली तरी याबाबतही काही स्पष्टता नाही.

Tags

follow us