नागपूरकरांना गुडन्यूज! सीएनजीच्या दरात मोठी घसरण; आता ‘इतक्या’ रुपयांत मिळतंय इंधन

CNG Price : देशात महागाईने उच्चांक गाठला असून या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनांच्या किंमतींसह खाद्यपदार्थांचेही दर भरमसाठ वाढले आहेत. अशा परिस्थितीत मात्र नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नागपूर शहरात (Nagpur News) सीएनजीच्या दरात (CNG Price) मोठी घसरण झाली आहे. एका वर्षात नागपुरात सीएनजी 26 पैशांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये […]

Untitled Design   2023 04 07T165032.294

CNG PNG

CNG Price : देशात महागाईने उच्चांक गाठला असून या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनांच्या किंमतींसह खाद्यपदार्थांचेही दर भरमसाठ वाढले आहेत. अशा परिस्थितीत मात्र नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नागपूर शहरात (Nagpur News) सीएनजीच्या दरात (CNG Price) मोठी घसरण झाली आहे. एका वर्षात नागपुरात सीएनजी 26 पैशांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये नागपुरात सीएनजी 116 रुपये प्रति किलो होता. आता मात्र 89 रुपये 90 पैसे या दराने मिळत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या रात्रीपासूनच दर कमी झाले आहेत. दहा रुपयांनी किंमती कमी झाल्या आहेत. 15 ऑगस्टपर्यंत सीएनजी 99 रुपय 90 पैसे या दराने मिळत होताा. संपूर्ण देशाचा विचार केला तर नागपुरातच सर्वात महाग सीएनजी होता. त्यानंतर मात्र दरात टप्प्याटप्प्याने घसरण होत गेली.

Chandrashekhat Bavankule : राजकीय अस्तित्त्व अन् पक्ष टिकवण्यासाठी पवारांची मोदींवर टीका

नागपूर शहरात ऑटोरिक्षांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ऑटो रिक्षााचालकांना या दरकपातीचा मोठा फायदा मिळणार आहे. कारचालकांचीही संख्या मोठी आहे. सीएनजीच्या दरात घसरण झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र जैसे थे आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी व्हावेत अशी मागणी आहे. मात्र सरकारने अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही.

सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) हा देखील एक प्रकारचा नैसर्गिक वायू आहे. सीएनजी उच्च दाबाने कंप्रेस्ड केली जातो. सीएनजीचा वापर प्रामुख्याने वाहनांसाठी केला जातो. सिलिंडरमध्ये जास्तीत जास्त वायू साठवून त्याचा जास्त काळासाठी वापर करणे हा गॅस कंप्रेस्ड करण्याचा उद्देश आहे.

Exit mobile version