Download App

अकोल्यात दंगलीनंतर स्मशाण शांतता; व्हिडीओ आला समोर, नेमकं घडलं काय?

Akola Riots : अकोला शहरात मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल(big riot between two groups) झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केल्यामुळे ही आधी भांडण आणि मग दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. या दंगलीमध्ये आत्तापर्यंत दोन्ही गटातील 10 जण जखमी झाले असून दोन पोलीसही जखमी झाले आहेत. अकोला शहराच्या विविध भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. दंगलखोरांकडून पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2 नाही, तर ‘या’ 4 नेत्यांमध्ये चुरस, काँग्रेसच कार्याध्यक्षांनी नावंही जाहीर केली

सोशल मीडियावर एकाने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने आधी भांडण आणि दोन गटात राडा झाला. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करत होते. त्याचवेळी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक सुरु झाली. पोलीस बाहेर येताच दंगलखोरांनी जाळपोळ सुरु केली. त्यानंतर पोलिसांना पोलीसफाटा मागवावा लागला. यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.


या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या कार्यालयाने सांगितले की, अकोल्यातील घटनेबाबत रात्रीपासून ते डीजीपी आणि अकोला पोलिसांच्या संपर्कात होते. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे. या घटनेत आत्तापर्यंत सुमारे 30 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे (Sandeep Ghuge)म्हणाले की, रात्री शहरात जातीय तणाव निर्माण झाला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना शहराच्या काही भागात अचानक दगडफेक सुरु झाली.

दंगलखोरांनी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला. शहरातल्या संमिश्र वसती असलेल्या भागात कलम 144 लागू केली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

Tags

follow us