Download App

माजी आमदार रेड्डींनी फडणवीस, बावनकुळेंसमोरच जयस्वालांसह तुमानेंवर काढली भडास

Mallikarjun Reddy On Ashish jayswal krupal tumane : रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी रविवारी झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात आपल्याच पक्षातील नेत्यांचे वाभाडे काढले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याचवेळी रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल आणि खासदार कृपाल तुमाने यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. रेड्डींच्या या कृतीची मोठी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे.

कर प्रणालीवर अश्नीर ग्रोवरचे मोठे विधान, सोशल मीडियावर खळबळ

घडलं असं की, रविवारी देवेद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात आमदार आशिष जयस्वाल आणि कृपाल तुमाने एकाच व्यासपीठावर दोघांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या स्वागतापूर्वीच माजी आमदार रेड्डी यांनी माईक घेऊन आपली भडास काढली. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Sushma Andhare : कपाळी टिळा, मुखी हरिनाम; माऊलींच्या पालखीत अंधारेंनी लाटल्या चपात्या

त्यावेळी माजी आमदार रेड्डी म्हणाले की, 2019 मध्ये पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी दिली, पण आमदार आशिष जयस्वालांनी तेव्हा भाजपची सीट पाडली. तेव्हा भाजप-शिवसेना युती असताना जयस्वाल निवडणुकीला उभे का राहिले.जयस्वाल बाजप-सेना युतीच्या सध्याच्या सरकारमध्ये आहेत, पण आमच्या मेळाव्यात ते कशासाठी आले आणि मंचावर बसले? असा थेट सवाल रेड्डींनी केला.

आमदार जयस्वालांनी महाविकास आघाडीला अडीच वर्ष साथ दिली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत ते राहिले, नंतर ते आपल्यासोबत कशासाठी आले? ते काही भाजपचं काम करण्यासाठी आले का? तर नाही, केवळ मंत्रिपद पाहिजे म्हणून आले. कमळाच्या चिन्हावर लढत नसलेला माणूस आपल्या मंचावर बसत असेल तर हे मला मान्य नाही, असे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले.

Tags

follow us