Sushma Andhare : कपाळी टिळा, मुखी हरिनाम; माऊलींच्या पालखीत अंधारेंनी लाटल्या चपात्या

Sushma Andhare : कपाळी टिळा, मुखी हरिनाम; माऊलींच्या पालखीत अंधारेंनी लाटल्या चपात्या

Ashadhi Wari : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. त्यानंतर आज माऊलींच्या पालखीच पुण्यातील विश्रांतवाडी येथे आगमन झाले. यावेळी दिंडीच्या भोजन पंगतसाठी अनेकांनी सेवा दिली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांच्या पंगतीसाठी लागणाऱ्या चपात्या लाटल्या. ही सेवा देताना सुषमा अंधारेंनी पंगतींना वाढण्याचं देखील काम केलं. (Sushma Andhare maked chpati in sant dnyaneshwar maharaj palkhi Ashadhi Wari 2023)

Video : आळंदीतील लाठीचार्ज प्रकरणातील दुसरा व्हिडीओ समोर

या वारकऱ्यांच्या सेवेबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील देली. त्या म्हणाल्या, आम्ही भाग्यावान आहोत की, या पालखी मार्गावर राहतो. विठूरायाच्या ओढीने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाची धुळ या रस्त्याला लागते. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. संपूर्ण राज्यात या पालखी सोहळ्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. या वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी आम्ही येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने थांबलेलो आहोत.

तसेच यावेळी त्यांनी माऊलींना साकडं देखील घातलं त्या म्हणाल्या शिवसेनेच्या वतीने माऊलींकडे एकच मागणं आहे. जे सत्य असेल ते जिंकू दे. सत्याचा विजय होऊ दे. सत्याच्या पाईकांना संयम ठेवण्याची शक्ती दे. उमेद दे. अशी प्रार्थना त्यांनी केली. त्याचबरोबर त्या असं देखील म्हणाल्या, हा वारीचा विषय आहे. येथे राजकीय बोलणार नाही. फक्त राज्यातील शेतकऱ्यांना सुखी ठेवावे अशी प्रार्थना त्यांनी केली.

असला कुठलाही प्रकार घडला नाही, लाठीचार्ज प्रकरणातील आरोप बावनकुळेंनी फेटाळले

त्याचबरोबर त्यांनी यावेळी आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. त्यावर देखील अशी प्रतिक्रिया दिली. 300 वर्षांची वारीची परंपरा आहे. तीन ते चार महिने अगोदर त्याचं नियोजन केलं जातं. त्यात एक शिस्तबद्धता असते. मात्र गेल्या 300 वर्षांत कोणीही वारकऱ्यांवर असा लाठीचार्ज केला नाही. हा लाठीचार्ज निंदनीय आहे. भाजप आणि त्यांच्या अध्यात्मिक आघाडी यावर आता काहीच बोलत नाहीत. वारकऱ्यांना मारहाण झाल्याचे व्हिडीओ समोर आले तरी देखील फडणवीस मारहाण झाली नाही असा दावा करत आहेत. त्यामुळे राज्याला खरे बोलणारे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री लाभावे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube