Download App

‘मराठ्यांचे ओबीसीकरण करू नका, अन्यथा…’; विदर्भ तेली समाज महासंघाचा इशारा

  • Written By: Last Updated:

Maratha vs Kunbi : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेत मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. तसा जीआर देखील काल सरकारने काढला आहे. त्यामुळं कुणबी समाज आक्रमक झालाच आहेत. तर आता तेली समाजही (Teli community) आक्रमक झाला आहे.

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरळीत करण्याच्या नावाखाली मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्याने तेली समाजासह इतर समाजावर हा अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने सरकारला दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाळ अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा महिला अध्यक्षा मीनाक्षी गुजरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे आदी उपस्थित होते.

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका 

मराठा जातीचे कोणत्याही परिस्थितीत ओबीसीकरण करू नये. त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. हे दिल्यास हा केवळ कुणबी समाजावर अन्याय होणार नाही तर संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय होईल. त्यामुळे तेली समाज हा अन्याय कदापि सहन करणार नाही. याविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरेल, तसंच राज्यस्तरावर बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अशी तेली समाजाची मागणी आहे.

राज्य सरकारने ओबीसींविरोधात अन्यायकारक निर्णय घेतल्यास राज्यभरात ओबीसी रस्त्यावर उतरतील. आणि ओबीसी विरोधी भूमिका घेणाऱ्या सर्व पक्षांच्या विरोधात आगामी निवडणुकांत मतदान करतील, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने दिला आहे. कुणबी आणि तेली समाज आक्रमक झाल्यानं सरकारची कोंडी होत आहे.

Tags

follow us