Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

  • Written By: Published:
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

Sameer Wankhede : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप होता. मात्र, चौकशीत समीर वानखेडेंवरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने (केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण) म्हटलं आहे. त्यामुळं वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे की, समीर वानखेडेंसाठी नेमलेल्या चौकशी समितीचा एनसीबीचे संचालक ज्ञानेश्वर सिंह हे भाग नव्हते. सिंह यांनी केलेल्या तपासाची सर्व माहिती त्यांच्याकडे होती असे म्हणता येणार नाही.

समीर वानखेडे हे NCB च्या मुंबई विभागीय संचालक पदावर असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले. कॉर्डेलिया क्रूज शिपवर रेव्ह पार्टी सुरू असताना तिथं अंमली पदार्थ असल्याची माहिती वानखेडेंच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली होती.

G-20 Summiti : G-20 शिखर परिषदेासाठी जगभरातील नेते दिल्लीत दाखल; बायडेन, सुनक यांचेही आगमन, पाहा व्हिडोओ 

छाप्यानंतर अनेक मुलं-मुली अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आले होते. यामध्ये आर्यन खानही होता. एनसीबीच्या पथकाकडून पुढे आर्यन खानवर कारवाई करण्यात आली. काही दिवस त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. ड्रग्ज प्रकरणात केलेली ही अटक देशभरात गाजली होती. आर्यन खानला एसआयटीच्या तपासानंतर एनसीबीनं क्लीनचिट दिली होती.

या प्रकरणात आर्यनला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच घेतली होती, असा आरोप करण्यात आलाा होता. या गंभीर आरोपाममुळं वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. यावर बरीच चौकशी झाली. नंतर तपासाचा धागा कॅटकडे सोपवण्यात आला. अखेर समीर वानखेडे यांनी कोणतीही लाच घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube