Bacchu Kadu : राज्यात जुलै महिन्यात अनपेक्षित घटना घडल्या आणि अजित पवार (Ajit Pawar) थेट सरकारमध्येच दाखल झाले. त्यांनी नुसतीच (Bacchu Kadu) एन्ट्री घेतली नाही तर स्वतःसह आठ आमदारांना वजनदार मंत्रीपदेही मिळवून दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शिंदे गटातील आणखी काही आमदारांना मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या घडोमोडी घडल्या. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी उफाळून आली. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनीही आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. तसेच कडू आता भाजपवर (BJP) टीका करतानाही दिसत आहेत. आताही त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपाकडून मला त्रास होतोय. आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावलं.
कॅबिनेटला दांडी, प्रमुख नेतेही देवगिरीवर; नेमकी अजितदादांचे काय बिघडले ?
कडू यांनी काल अकोला येथे प्रसारमाध्यमांशी (Bacchu Kadu) संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मला भाजपाचा खूप त्रास आहे. आम्हाला काँग्रेसचा (Congress) आणि अन्य पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. परंतु, आम्ही त्यांना जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. परंतु, माझं म्हणणं आहे की मैत्री करताना मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावलं पाहिजे. पण, मित्रत्व न निभावता फक्त कामापुरता वापर करून घ्यायचा आणि नंतर दुर्लक्ष करायचे हे अत्यंत चुकीचे आहे, असे कडू म्हणाले.
किमान भाजपकडून तरी असं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी सत्तेपुरता विचार न करता सत्तेपलीकडे काही गोष्टी असतात त्या स्वीकारल्या पाहिजेत. आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठीच फिल्डिंग लावायची हे उद्योग त्यांनी बंद केले पाहिजेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Uday Samant : CM शिंदेंच्या आमदारांना मंत्रीपद मिळणार? सामंतांचं ‘पॉझिटिव्ह’ उत्तर
दरम्यान, बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. खरं तर तेव्हापासूनच भाजप आणि कडू यांच्यात जास्त वाद होत आहेत. कारण, या मतदारसंघातून भाजप विद्यमान खासदार नवनीत राणा यांना संधी देण्याच्या विचारात आहे. नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा हे देखील भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. या दोघा पती पत्नींना राजकीय ताकद देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांच्या प्रजपा कडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.