Tanaji Mutkule : येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी (Vidhansabha Election) जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील रुग्णालयात (Mumbai Hospital) हलवण्यात आलं.
शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दोनशे रुपये जास्त द्यावा; भगवानगडाचे सचिव घोळवे यांची मागणी
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आमदार मुटकुळे यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आज त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आमदार मुटकुळे यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आले. मात्र, त्यांना कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं हे अद्याप समोर आलं नाही.
विरोधक छोट्या मनाचे, त्यांना विकास दाखवून द्या; आमदार आशुतोष काळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
आमदार तानाजी मुटकुळे हे गेल्या 10 वर्षांपासून हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. 2005 ते 2009 या काळात येथील भाजपची पक्षसंघटना मजबूत करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. 2009 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसचे उमेदवार भाऊराव बाबुराव पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसचे राजीव सातव यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. तेव्हापासून या मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व आहे.
दरम्यान, आमदार मुटकुळे हे यंदा आपले चिंरजीव शिवाजी मुटकुळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी उत्सुक असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यांच्या मतदारसंघात सध्या सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील सुमठानकर आणि डॉय विठ्ठल रोडगे यांनीही निवडणूक तयारी सुरू केल्यानं यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.