Akola News : विधानपरिषदेचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसे वादात मनसेच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. जय मालोकरचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे त्यावेळी सांगितले होते. मात्र मालोकरच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. जय मालोकरचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर जबर मारहाणीमुळे झाला असा धक्कादायक खुलासा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उघड झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
FIR मध्ये राज ठाकरेंचं नाव घेत मिटकरींची फिर्याद; गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचाही झाला मृत्यू
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, पण ते नसतानाही धरणं वाहिलं. मुळा – मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झाली आहे त्यामुळे आता अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सरकारने या गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. मुसळधार पावसामुळे अनेक लोकांची वाहने पाण्याखाली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर पुण्याची पूरस्थिती हाताळण्यात अपयश आल्यावरून ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
त्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुपारीबाचा शब्द वापरत राज ठाकरेंना उत्तर दिलं होतं मिटकरी म्हणाले होते की, दिलेल्या शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर सुपारी बहाद्दरांनी बोलू नये सुपारी बहाद्दरांचं टोल नाका भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन यशस्वी झालं नाही त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासातील सार्वधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लावला होता. यावरूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. या आंदोलनाच्या काही तासांनंतरचय जय मालोकरच्या मृत्यूची बातमी आली होती.
राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणं भोवलं; मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी
जय मालोकरला जबर मारहाण झाल्याने त्याची पाठ, छाती, डोके आणि मानेवर जबर मार लागला होता. छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर झाल्या होत्या. त्याच्या डोक्याला आतील बाजूने गंभीर दुखापत झाली होती. पोस्ट मार्टमवेळी जय मालोकरच्या मेंदूला सूज आली होती. त्यामुळे त्याच्या मेंदूचे वजन वाढले होते. मानेवर जबर मारहाण झाल्याने त्याच्या मज्जातंतूंना दुखापत झाली होती. या सर्व गोष्टीमुळे त्याचा न्युरोजनिक शॉकमुळे मृत्यू झाल्याचे पोस्ट मार्टम अहवालात नमूद करण्यात आले आहे.