Download App

चाकूने वार करून ठार करू; खासदार नवनीत राणांना फोनवरून धमकी

  • Written By: Last Updated:

MP Navneet Rana Death Threat : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांना धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी खासगी सचिवाच्या तक्रारीवरून अमरावतीमधील राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू केला आहे. त्यात धमकी देणाऱ्याचे नाव समोर आले आहेत. विठ्ठलराव नावाचे व्यक्तीने नवनीत राणांना धमकी दिली आहे. या व्यक्तीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने बच्चू कडू आक्रमक, ‘सरकारने नालायकपणा करु नये’

16 ऑगस्टपासून नवनीत राणा यांच्या मोबाइलवर धमकीचे फोन येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करेल, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्दात धमकी देण्यात आली आहे. या धमकीबरोबर राणा यांना अश्लिल शिविगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रिपाईला मंत्रिपद द्या! केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम…

गेल्या पाच दिवसांपासून ही धमकी येत होती. त्यामुळे राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार जीवे मारण्याची धमकी देणे, अश्लिल शिविगाळ करणे या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर राजापूर पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या सह्याने तपास करत आरोपीचे नाव शोधले आहे. या व्यक्तीला शोधण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी खासदार राणा यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले होते. मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी खासदार राणा यांना फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदविला असला तरी आरोपीचा शोध लागलेला नाही.

तर धमकी प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीतही एक गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा नवनीत राणा यांना धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे.

Tags

follow us