सावधान! विजांच्या कडकडाटासह जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा

चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Alert

Rain Alert

Weather Update : राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. मार्च महिन्यातील (Weather Update) रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत आहे. दुपारच्या वेळेत सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. या कडाक्याच्या उन्हात घरातून बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. अशी परिस्थिती असतानाच दिलासा देणारी बातमीही आली आहे. खरंतर उन्हाळ्यात कधी पाऊस होत नाही. पण हवामानात बदल झाला की उन्हाळ्यात पावसाचा अनुभव येतो. आताही दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत गारपीट (Heavy Rain) होईल. मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे हवामान थंड होणार असले तरी पिकांना (Crop) मात्र फटका बसण्याची शक्यता आहे.

सावधान! कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी, ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; पुढील तीन दिवस..

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. येत्या 25 मार्चपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहील. नाशिक आणि खानदेश भागात हवामान सामान्य राहील. या स्थितीमुळे येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानात घट झालेली दिसून येईल.

दरम्यान, राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तीन दिवस सावधान, ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् 75 किलोमीटर वेगाने वारे, अलर्ट जारी

Exit mobile version