सावधान! कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी, ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; पुढील तीन दिवस..

भारतीय हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. ज्यात पुढील तीन दिवसांत विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update

Weather Update : राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. मार्च महिन्यातील (Weather Update) रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत आहे. दुपारच्या वेळेत सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. या कडाक्याच्या उन्हात घरातून बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. अशी परिस्थिती असतानाच दिलासा देणारी बातमीही आली आहे. खरंतर उन्हाळ्यात कधी पाऊस होत नाही. पण हवामानात बदल झाला की उन्हाळ्यात पावसाचा अनुभव येतो. भारतीय हवामान विभागाने राज्यात (IMD Rain Alert) काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. यानुसार राज्यात पुढील तीन दिवसांत विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धुळे, नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असेल. तसेच पाऊस देखील होईल. नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल अशी शक्यता आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांत गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि पुणे जिल्ह्यात मात्र वातावरण सर्वसामान्य राहील. उष्णता वाढत असल्याने पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार जर पाऊस बरसला तर उन्हाळ्यात काहीसा दिलासा नक्कीच मिळणार आहे.

राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांत अतिमुसळधार, यलो अलर्ट जारी; पुढील 48 तास पावसाचे..

राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

follow us