Download App

फडणवीसांना थेट नडणाऱ्या अ‍ॅड. उकेंचा पाय आणखी खोलात; पोलिसांनी उपसलं मोक्काचं हत्यार

नागपूर : येथील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश उके (Satish Ukey) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उकेंसह आणखी सहा जणांवरही या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीची बाभुळखेडा येथील सिलिंगची 1 एकर जमीन बनावट दस्तावेजांच्या आधारे हडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Nagpur-based lawyer and social activist Satish Ukey was booked under the Maharashtra Control of Organised Crime Act 1999)

याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल ढवळे यांची मूळ मालकीची असलेली जमीन ही उके आणि इतर साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपली आणि दुसऱ्यांना विकली, असा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर नागपूर सुधार प्रन्यासचे (NIT) विभागीय अभियंता पंकज पाटील यांनी उकेंविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे उके आणि इतर सहा जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पवारांना ऑफर देण्याइतके अजितदादा मोठे नाही; राऊतांनी दाखवली जागा

या प्रकरणी सतीश उके यांच्यासह भाऊ प्रदिप उके, त्यांची पत्नी माधवी, पेखर महादेवराव उके, मनोज महादेवराव उके, श्रीरंग हौसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुभाष मणिलाल बघेल आणि चंद्रशेखर नामदेवराव मते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर सुधार प्रन्यासकडून (NIT) या वर्षी जानेवारीमध्ये औपचारिक तक्रार मिळाल्यानंतर अजनी पोलिसांनी उके आणि इतरांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत बनावट कागदपत्रे, फसवणूक आणि विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आम्ही आता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, नागपूर पोलिसांनी उके आणि त्यांच्या भावांविरुद्ध आतापर्यंत 13 गुन्हे दाखल केले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

Pune Crime : पुणे हादरलं! तलवार, कोयत्याने वार करत महापालिकेच्या दारातचंं तरूणाची हत्या

उके सध्या मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने गेल्या वर्षी उके आणि त्यांचा भाऊ प्रदिप यांना अटक केली आहे. मौजा बोखरा येथील 5 एकर जमीन हडप प्रकरणात आणि 11.5 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यानंतर एप्रिल 2022 पासून दोघेही मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. मयत मोहम्मद समद यांचा पुतण्या मोहम्मद जफर यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सतीश उके हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अनेक नेत्यांना थेट अंगावर घेताना दिसून येतात. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी 2 गुन्हे लपविले असल्याचा दावा करत उके यांनी निवडणूक आयोगात आणि स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते. उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही निकटवर्तीय मानले जातात. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणातही उके यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. लोया यांच्या “गूढ” मृत्यूबद्दल शंका उपस्थित करत त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती.

Tags

follow us