Download App

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन काँग्रेस पुन्हा आक्रमक; विधानभवनावर धडकणार ‘हल्लाबोल’ मोर्चा

Nana Patole : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)प्रचंड अडचणीत आहे. शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या (Unemployment)नाहीत. आरक्षणावर (reservation)निर्णय घेतला जात नाही. ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपप्रणित (BJP) शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ

जनतेला वाऱ्यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजप व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा ‘हल्लाबोल’ मोर्चा (Hallabol Morcha)सोमवारी दि. 11 डिसेंबरला विधानभवनावर धडकणार आहे. विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

सौ सौनार की एक लोहार की, दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ; भुजबळांचा जरांगेंना इशारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतकऱ्यांना भरपूर दिले आहे, अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करुन आले पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. अपहरण, हत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे NCRB च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अहवाल कसा वाचायचा, याचे ज्ञान पाजळून मूळ मुद्याला बगल देत आहेत.

राज्यात विविध खात्यातील 2.5 लाख पदं रिक्त आहेत, पण सरकार नोकर भरती करत नाही. लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, पण सरकार परीक्षाही घेत नाही. सरकारच्या वेळकाढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे.

शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावानं शेतमाल खरेदी केंद्र सुरु करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा सुव्यवस्था सुधारावी अशा विविध मागण्या घेऊन काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा विधानभवनावर धडकणार असल्याचे यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Tags

follow us