सौ सौनार की एक लोहार की, दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ; भुजबळांचा जरांगेंना इशारा

  • Written By: Published:
सौ सौनार की एक लोहार की, दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ; भुजबळांचा जरांगेंना इशारा

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकी सुरू आहेत. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे पाटील भुजबळांचा ऐकेरी उल्लेख करत जातीयवादी असल्याचा आरोप करत आहे. दरम्यान, आज इंदारपूरच्या सभेत बोलतांना भुजळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मी काही बोललो तर काही विद्वान लोक बोलायला लागतात की, दोन जातीत भांडणे लावत आहेत. मात्र, जरांगे रात्री सभा घेतात. मात्र, पोलिस त्यावर कारवाई करत नाही. कायदा फक्त आपल्याला त्यांना नाही. दादागिरी कराल तर दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशारा भुजबळांनी दिला.

ओवेसींची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती : तेलंगणात राजकीय वादळ, भाजपचे राज्यपालांना पत्र 

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा तिसरा मेळावा इंदापूरमध्ये झाला. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, आपली सभा रात्री दहा वाजता संपते. त्यांची रात्र 12ला, 2 ला बंद होते. त्यांना परवानगी आहे की नाही हे माहीत नाही. पोलिस कारवाई करत नाहीत. ते म्हणतील तो कायदा. कायद्याने फक्त तुम्हाला आणि आम्हाला. ते काहीही बोलल तरी त्यांच्या बातम्या छापून येणार. मी पंधार दिवसानंतर बोललं तरी वातावरण बिघडवलं म्हणणार… आमचं असंच आहे. सौ सौनार की एक लोहार की.

भुजबळ पुढे म्हणाले, राहत्याला दोन दलित कुटुंबानी मतदान केलं नाही. म्हणून त्यांच्यावर घरावर चारशे पाचशे लोक आली. त्यांना मारहाण केली. आमच्याकडेपण तलवारी आहेत, कुऱ्हाडी आहेत, २४ तारखेनंतर तुझा हिशोब करतो. तुला दाखवतो, असं जरांगे म्हणतात. हे काय चाललं. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल भुजबळांनी केला.

Income Tax Raid : 300 कोटींचं घबाड सापडलेले कोण आहेत धीरज साहू? 

दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ
मराठा समाजाला आमचा विरोध नाही. झुंडशाहीला आमचा विरोध आहे. दादागिरीला विरोध आहे. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ,असा इशाराही दिला.

पोलिसांकडून बचावात्मक हल्ला
ते म्हणाले, जालन्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. मग पोलिसांनी लाठीचार्ज केला, असे मी बरेच दिवस सांगत होतो. पण कुणीही काही बोलायला तयार नाही. मात्र, अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लेखी उत्तर दिले, त्यात त्यांनी ७९ पोलीस जखमी झाल्याचे सांगितले. बचाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि 50 जण जखमी झाले. ही गोष्ट आधी समोर यायला हवी होती. ही बाजू उशाराने पुढं आली. अन्यथा त्यांना इतकी सहानुभूती मिळाली नसती.

हर्षवर्धन पाटील-मोहिते पाटलांवर निशाणा
यावेळी भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावरून हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. विचार करणारा मराठा समाज गप्प का? मराठा समाजाच्या मतांसाठी गप्प आहात का, अनेक नेते आरक्षणावर बोलायला तयार नाहीत. कशाची भीती आहे? तुम्हाला मतांची भीती वाटते का? त्यांच्याकडे मते आहेत, आमच्याकडे नाहीत का? त्यांची 20 टक्के आहेत, तर आमची 80 टक्के मते आहेत…. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह पाटील तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवे आहे का? तुम्ही हे सांगितलं पाहिजे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात एकही मराठा उरणार नाही, असे भुजबळ म्हणाले.

आरक्षण हा गरिबी हटावण्याचा कार्यक्रम नाही
जरांगे लेकरं लेकरं करतात. तुझी लेकर बाळ आहे. गरीब आहेत, हे सगळं खरं आहे. पण, आमचीही लेकर आहेत. आणि आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. आरक्षण मिळालं म्हणमजे, सगळ्यांना नोकरी मिळेलचं, असं नाही. मात्र, त्याला समजतच नाही. त्याला काय करणार? तो अकलेने दिव्यांग आहे, अशी टीकाही भुजबळांनी केली.

मी गावातून गेल्यावर रस्ता गोमूत्राने धुतला. का तर मी शुद्र आहे म्हणून रस्ता धुतला. तुम्ही आमच्यासोबत शुद्र होण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मागताय का, असा खोचक सवालही भुजबळांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube