Download App

Jayant Patil : तीन राज्यातील भाजपच्या विजयावरून जयंत पाटील अन् अजितदादांचं एकमत; शिंदे फडणवीस टार्गेट

Jayant Patil On Devendra Fadnavis : मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan),आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यातील विधानसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला. याचा आनंद आहे. त्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची स्वतःची इमेज आहे. तुम्हाला त्या राज्यांत कोण विचारतंय? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना लगावला आहे. त्याचवेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांना तुम्ही त्या ठिकाणी प्रचारासाठी घेऊन गेले नाहीत, असेही म्हणत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला आहे.

अदिती राव हैदरी हिने ज्युबिली अन् ताजसाठी जिंकला लोकप्रिय अभिनेत्री-वेब मालिका सन्मान

जयंत पाटील म्हणाले की, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यामध्ये तुम्हाला कोण ओळखत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो करिश्मा आहे, त्यावर या तीन राज्यांच्या निवडणुका जिंकल्या आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचाराला गेले. एक उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले. तिसरे उपमुख्यमंत्री अजितदादा मात्र प्रचारालाच गेले नाहीत.

जालना हादरलं! दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या; एकच खळबळ

त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले की, मी तिथं जाऊन काय दिवे लावणार होतो?, त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मी यांना तेच समजावण्याचा प्रयत्न करत आहे की, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय केलं? अजितदादांना जे कळालं ते अजून यांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कळालं नाही असंही जयंत पाटील म्हणाले.

यावेळी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यामध्ये निवडणुकींच्या प्रचाराला जाण्यावरुन किंवा न जाण्यावरुन उपमुख्यमंत्री अजितदादा आणि जयंत पाटील यांचं एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसऱ्या दिवसाचं कामकाज सुरु आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्याचबरोबर कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना सहन करावा लागणारा मोठा फटका यावरुन आज सभागृहात विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

follow us

वेब स्टोरीज