जालना हादरलं! दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या; एकच खळबळ

जालना हादरलं! दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या; एकच खळबळ

Gajanan Taur Murder : जालन्यातील मंठा चौफुली परिसरात एकावर गोळीबार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी गजानन तौर (Gajanan Taur) याच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर अज्ञात आरोपी पसार झाले आहेत. गोळीबारात मृत्यू झालेला गजानन तौरवर अनेक गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक समोर आली आहे. या घटनेमुळे जालना जिल्हा हादरुन गेला आहे.

‘…तोच न्याय प्रफुल्ल पटेलांना लावणार का?’, मलिकांच्या मुद्यावरून ठाकरेंनी फडणवीसांना घेरलं

नेमकं काय घडलं?
जालन्यातील गजानन तौर याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हा दाखल आहेत. गजानन तौर जालन्यातील मंठा चौफुली परिसरात असताना दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी अचानक गोळीबार सुरु केला. या गोळीबारात गजानन तौर याला गोळ्या लागल्या. गोळीबार झाल्यानंतर आरोपींनी तत्काळ घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.

Supreme Court चा निर्णय म्हणजे अखंड भारत…; कलम 370 वैध ठरल्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया

या गोळीबारातील अज्ञात आरोपी एक दुजाकीवरुन तर दोघे कारमधून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. आपला पाठलाग होत असल्याने आरोपींची कार एका खड्ड्यांत जोरात आदळली. याचदरम्यान पोलिसांनी कारला घेरलं आणि एका आरोपीला पकडलं. त्यातील दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव लक्ष्मण गोरे असल्याचं समोर येत आहे.

ट्रक ड्रायव्हर्सचा प्रवास होणार ‘गारेगार’: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

घटनेनंतर पोलिसांनी गजाजन तौर याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला घाटी रुग्णालयात हलवला आहे. यासोबतच इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु असून या घटनेला जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हत्येचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेमुळे जालना जिल्हा हादरुन गेला असून मंठा चौफुली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube