अदिती राव हैदरी हिने ज्युबिली अन् ताजसाठी जिंकला लोकप्रिय अभिनेत्री-वेब मालिका सन्मान
Aditi Rao Hydari: डिव्हाइड बाय ब्लड अँड ज्युबिली या वेब सिरीजमधील (web series) उत्कृष्ट अभिनयासाठी मुंबई येथे आयोजित 23व्या ITA अवॉर्ड्समध्ये (ITA Awards) लोकप्रिय अभिनेत्री अदिती राव हैदरीला (Aditi Rao Hydari) पुरस्कार देण्यात आला आहे. तिच्या आकर्षक आणि अनोख्या अभिनयासाठी हा खास पुरस्कार तिने जिंकला असून एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध करून दाखवलं आहे.
View this post on Instagram
ताज: डिव्हाइड बाय ब्लडमधील भावपूर्ण अनारकलीचे अदितीचे पात्र तिने उत्तम साकारल तिचे भावनिक अभिव्यक्ती आणि सुंदर अभिनय कायम चाहत्यांना भावून गेला आहे. ज्युबिलीमध्ये 40 च्या दशकातील सुपरस्टार सुमित्रा कुमारी म्हणून आदितीने आणखी एक अनोखी कामगिरी बजावली आहे, आणि सुमित्रा कुमारीची भूमिका आपलीशी केली. अदिती सहजतेने भावपूर्ण नृत्यांगना पासून सुमित्रा कुमारीच्या करिष्माई आणि शक्तिशाली व्यक्तिमत्वात बदलते, वेगवेगळ्या भूमिकांवर तिची कमांड दाखवते.
वेब सीरिजच्या जगात एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने तिची बाजू पक्की करून ठेवल्याचे दिसत आहे. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असून ज्यात विजय सेतुपतीसोबतचा मूक सिनेमा “गांधी टॉक्स” आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत “हीरामंडी” या वेब सिरीजचा समावेश असणार आहे. पहिला इंडो-ब्रिटिश सहयोगी सिनेमा “लायनेस” मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा खिलाडी, सिंघम अन् किंग खान केंद्राच्या रडारवर; तंबाखूच्या जाहिरातीसाठी थेट धाडली नोटीस
20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यामध्ये मानाचा इफ्फी (IFFI) म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया चित्रपट महोत्सव सुरू झाला होता. या दरम्यान अनेक चित्रपटांची चर्चा होत असताना त्यात अदिती राव हैदरी या अभिनेत्रीची तेवढीच चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे या चित्रपट महोत्सवामध्ये या अभिनेत्री दुहेरी भूमिकेत आहे. तिचा एक मुकपट आला आहे. ज्याचं स्पेशल स्क्रनिंग या महोत्सवात झालं आहे. तर दुसरीकडे ती एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणार आहे. त्याची घोषणा देखील यामध्ये करण्यात आली होती.