Naveet Rana : हनुमान चालीसा म्हटल्यानं कोर्टात यावं लागतयं ही ठाकरेंचीच देण…

हनुमान चालीसा पठन केल्याने कोर्टात यावं लागतयं, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर खासदार राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा […]

Navneet Rana

Navneet Rana

हनुमान चालीसा पठन केल्याने कोर्टात यावं लागतयं, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर खासदार राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी

नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीसाठी कोर्टाने जेव्हा जेव्हा बोलावलं तेव्हा तेव्हा आम्ही हजेरीसाठी उपस्थित झालो आहोत. आम्ही फक्त हनुमान चालीसा वाचणार असल्याचं म्हटलं होतं, तरीही हनुमान चालीसा पठन केल्याप्रकरणी आमच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचं राणा यांनी स्पष्ट केलं आहे.

Gautami Patil : राजकारणातल्या दोन पाटलांच्या वादात गौतमीची उडी, म्हणाली माझ्यावर…

तसेच हनुमान चालीसाचं पठन केल्याने आम्हांला कोर्टात वारंवार हजेरी देण्यासाठी यावं लागत आहे, ही उद्धव ठाकरे यांचीच देण असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मातोश्रीच्या बाहेर येऊन हनुमान चालीसा वाचून दाखवणार असल्याचा इशारा नवनीत राणा यांनी दिला होता.

त्यानुसार नवनीत राणा त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीबाहेर दाखलही झाले होते. याचवेळी मोठा वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून राणा दाम्प्त्यांना अटकही झाली होती. या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालायात सुनावणी सुरु असून राणा न्यायालयात हजर झाल्या होत्या.

Exit mobile version