पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी

पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी

Baramati Medical College Name :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 398व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अहमदनगर या जिल्ह्यातील  त्यांच्या चौंडी या जन्मागावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडमणवीस, अहमदनगरचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते.

यावेळी राम शिंदे व गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना अहमदनगरचे अहिल्यानगर व्हायला पाहिजे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेतील असे म्हणत नामांतराचा चेंडू शिंदेंकडे भिरकावला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलताना अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकरनगर होणार असे जाहीर केले.

Ahmednagar Name Change : आता अहिल्यादेवी होळकर नगर! CM शिंदेंची थेट घोषणा

तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांनी बोलताना बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ही मागणी मान्य केली व बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी मान्य केली.

शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी

पडळकरांची ही मागणी वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी लगेचच ही मागणी मान्य केली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात दुसरी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. शिंदे- फडणवीसांनी हा निर्णय घेऊन एका बाणात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. याचे कारण बारामती लोकसभा मतदारसंघ हा आधीपासूनच भाजपच्या डोळ्यावर आहे. 2014 व 2019 या दोन्ही वेळेसच्या मोदी लाटेत भाजपला विजय मिळवता आला नाही. पण 2014 साली महादेव जानकर यांनी भाजपसोबत असताना बारामतीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे फक्त 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपने हा निर्णय घेऊन बारामतीतील धनगर समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…

बारामतीत गोपीचंद पडळकर यांचे वजन वाढले

तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी या महाविद्यालयाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची मागणी केली होती. यानंतर लगेचच ही मागणी मान्य झाली. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात गोपीचंद पडळकर यांचे महत्व वाढल्याची चर्चा सुरु झाली आहे. 2019 साली पडळकर यांनी बारामतीमधून अजित पवारांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेली पडळकरांचे डिपॉजिट जप्त झाले होते. पण आता पडळकर यांचे बारामतीत राजकीय वजन वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे एकप्रकारे आगामी लोकसभेसाठी बारामतीमधून गोपीचंद पडळकर उभे राहणार असल्याचे संकेत आजच्या कार्यक्रमातून दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube